पुणे : विधानसभेचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता मुदत संपली. अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला तर, काही ठिकाणी आपल्याला बंड पाहायला मिळलं. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना, काही ठिकाणी बंडखोर रिंगणात पाहायला मिळत आहेत.
पुण्यात महाविकास आघाडीत बंड: विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीत बंड पाहायला मिळलं. कसबा विधानसभा मतदारसंघात माजी महापौर कमल व्यवहारे तर पर्वती मतदारसंघातून आबा बागूल तसंच सचिन तावरे आणि शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद यांनी काँग्रेस पक्षातून बंड पुकारलं. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंड पाहायला मिळालं. तर शहरात भाजपा तसंच महायुतीत एकही बंड नसून पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसाआधी नाराज इच्छुकांची भेट घेत त्यांची नाराजी दूर केली होती.
जिल्ह्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीत बंड : पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात महायुती तसंच महाविकास आघाडीत आपल्याला बंड पाहायला मिळलं. इंदापूर मतदारसंघात प्रवीण माने यांनी बंड पुकारलं आहे, तर पुरंदर मतदारसंघात देखील महायुतीमध्ये संभाजी झेंडे यांनी बंड पुकारलं आहे. जुन्नर मतदारसंघात देखील शरद सोनवणे, आशाताई बुचके यांनी महायुतीमध्ये बंड पुकारलं. तर काही मतदारसंघात थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होताना पाहायला मिळत आहे.
कोणत्या मतदार संघात कशी होणार लढत...
१) कसबा मतदारसंघ
आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस
हेमंत रासने, भाजपा
गणेश भोकरे, मनसे
कमल व्यवहारे, काँग्रेस बंडखोर
२) छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ
आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपा
दत्ता बहिरट, काँग्रेस
काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार
३) कोथरूड मतदारसंघ
आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा
चंद्रकांत मोकाटे, उबाठा शिवसेना
किशोर शिंदे, मनसे
४) खडकवासला मतदारसंघ
आमदार भीमराव तापकीर, भाजपा
सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
मयुरेश वांजळे, मनसे
५) हडपसर मतदारसंघ
आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
साईनाथ बाबर, मनसे
६) वडगावशेरी मतदारसंघ
आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
७) पर्वती मतदारसंघ
आमदार माधुरी मिसाळ, भाजपा
अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार
सचिन तावरे, बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
८) पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ
आमदार सुनील कांबळे, भाजपा
रमेश बागवे, काँग्रेस
९) इंदापूर मतदारसंघ
हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
प्रवीण माने अपक्ष बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार