महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

संतोष देशमुख हत्याप्रकरणात बीडच्या एसपींची बदली, एसआयटीसह न्यायालयीन चौकशी- देवेंद्र फडणवीस - SANTOSH DESHMUKH MURDER CASE

बीडमधील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील हिंसाचार प्रकरणाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली.

Devendra Fadnavis announces judicial probe
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

नागपूर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सभागृहात निवेदन दिले. या प्रकरणातील संशियत वाल्मिक कराडचा सहभाग आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " वाल्मिक कराडचे सर्वांसोबत फोटो आहेत. पवारसाहेबांसोबत आहेत. आमच्यासोबत आहेत. कोणत्याही पक्षाशी संबंध असला तरी गुन्ह्यात संबंध आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी कारवाई करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात सहभाग दिसत आहे. दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सरपंच देशमुख प्रकरणात आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोकांतर्गत कारवाई करण्यात येणार आहेत.

बीडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांची होणार बदली-बीडमधील वाळू माफिया, वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे आणि भूमाफिया आहेत. त्यांच्याविरोधात मोहिम हाती घेऊन संघटित गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहेत. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करेल. तसेच न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तीन ते सहा महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्यात येईल. संतोष देशमुख यांच्यासारखा युवा सरपंच गेल्याचं दु:ख आहे. त्यांच्या परिवाराला १० लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाची कुचराई केल्याचं लक्षात येते. बीडच्या एसपीची बदली करण्यात येत आहे. पोलीस पीआय महाजन यांनी वेगानं कारवाई केली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नैतिक खच्चीकरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची आपली आणि सर्वांची जबाबदारी आहे. जातीय तणाव निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी. पोलिसाला तत्पपरेतेनं कारवाई करण्याचे सांगण्यात येईल.

धनंजय मुंडेंना सरकार घाबरत आहे का?सरकार राजकारण करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. "वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचविण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. आता कुणावर मोक्का लावणार आहात? वाल्मिक कराडला इतके वर्षे मोकाट सोडले. धनजंय मुंडेंना सोबत घेऊन चौकशी करणार आहेत का? धनंजय मुंडेंना सरकार घाबरत आहे का? वाल्मिक कराडला वाचविले तर सगळे वाचणार आहेत. दोन्ही प्रकरण सरकारडून बंद करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

  • आदित्य ठाकरे म्हणाले, 3 ते 6 महिन्यात पाळंमुळं शोधून काढणार आहात का? कुणाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे का? दोन्ही घटनांमध्ये गोल गोल फिरण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला.

ABOUT THE AUTHOR

...view details