नागपूर Parinay Phuke On Sanjay Raut : खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीनंतरचं उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातला संघर्ष अगदी टोकाला पोहचला आहे. "आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकू शकणार नाहीत," असं खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आता आक्रमक झाले आहेत. "संजय राऊत यांना स्वतःचे अस्तित्व नाही. दोन नेत्यांची चाकरी करून त्यांनी राज्यसभा खासदारसारखे पदे मिळवली", अशी घणाघाती टीका आमदार परिणय फुके यांनी केलीय.
प्रतिक्रिया देताना परिणय फुके (ETV Bharat Reporte) दोन नेत्यांची चाकरी करून मिळवली पदे: "संजय राऊत कधी लोकांमधून निवडूनही आलेले नाहीत. त्यांनी केवळ दोन नेत्यांची चाकरी करूनचं पदे मिळवली आहेत. लोकभावना काय असतात, हे त्यांना माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठया नेत्यावर या भाषेत बोलणं अत्यंत चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून राजकीय जीवनात सक्रिय आहेत. त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. विदर्भाला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम त्यांनी केलंय. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामधील सर्व जनता त्यांच्यासोबत आहे. त्यामुळं ते मागच्या वेळेपेक्षा रेकॉर्ड मतांनी ते निवडून येणार" असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला.
ही तर मानसिक दिवळखोरी :देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांमुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बदनाम होत असल्याची गंभीर टीका संजय राऊत यांनी केली. त्याला
परिणय फुके यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. "संजय राऊत खुळे नेते आहेत. देशात इतकी मोठी विचारधारा असलेल्या संघाबद्दल बोलणाऱ्या संजय राऊत यांच्याबद्दल मला कीव येत आहे," फुके म्हणाले आहेत.
संजय राऊतकडं दुसरा उद्योग नाही : "संजय राऊत यांच्याकडं दुसरा उद्योग उरला नाही. रोज सकाळी उठून टीव्ही चॅनलवर बडबड करत इतरांवर टीका करण्याशिवाय यांच्याकडं दुसरं काम नाही. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात झालेल्या विकासकामाच्या यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, हे काम विरोधी पक्षाचे नेते करत आहेत. काही दिवसापूर्वी अनिल देशमुख बोलतात. त्यानंतर उद्धव ठाकरे बोलले. आता संजय राऊत बेतालपणे बोलतात. हे लोकांचं मन दुसरीकडं भरकटवण्याचं हे प्रयत्न आहेत" असं फुके म्हणाले.
हेही वाचा -
- देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी? महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर - Devendra Fadnavis
- XXX टोळ्या घेऊन आमच्याशी लढणार का, संजय राऊतांचा हल्लाबोल; कवचकुंडलं काढून मैदानात या, सरकारला आव्हान - Sanjay Raut Slams Devendra Fadnavis
- देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे पूर्ण गुण: ही तर आमच्यासाठी आनंदाची बाब, 'या' मंत्र्यांनी व्यक्त केलं मत - Chandrakant Patil Statement