ठाणे :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच हेदेखील उपस्थित होते.
शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन :ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करत एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज (Source - ANI) एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे :कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे हे निवडणूक लढवीत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख आहे. विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला सर्व 288 मतदारसंघांसाठी मतमोजणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 105 जागा, शिवसेनेला 56 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये भाजपाला 122, शिवसेनेला 63 आणि काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.
अजित पवार यांनी यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हेही बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं बारामतीत यंदा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका-पुतण्यातील सामना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा
- बारामतीत कोण जिंकणार? काका की पुतण्या; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाचपाखडीतून दाखल केला उमेदवारी अर्ज
- ...अन् जितेंद्र आव्हाडांवर त्यांचाच नाराज कार्यकर्ता संतापला; भर रस्त्यात थांबवून केलं असं काही