महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भाजपाला मोठा झटका; 'या’ बड्या नेत्याने केला युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश, दर्यापूरमधून लढणार निवडणूक - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

अमरावतीमध्ये रवी राणा यांनी भाजपाला मोठा झटका दिला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश बुंदिले यांनी कार्यकर्त्यांसह रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केलाय.

Maharashtra Assembly Election 2024
रमेश बुंदिले युवा स्वाभिमान पार्टीत दाखल (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 7:44 PM IST

Updated : Oct 23, 2024, 9:18 PM IST

अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झालेले रमेश बुंदिले (Ramesh Bundile) यांनी आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीत (Yuva Swabhiman Party) प्रवेश केला. विशेष म्हणजे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार म्हणून रमेश बुंदिले हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.


अभिजीत अडसूळ यांना करणार विरोध :अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून अभिजीत अडसूळ यांचं नाव जाहीर झालय. आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीत असला तरी अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात माजी आमदार रमेश बुंदिले हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात अभिजीत अडसूळ यांनी काम केलं होतं. मुंबईत कांदिवली भागात राहणाऱ्या अभिजीत अडसूळ यांचा दर्यापूर विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्याचा काही संबंध नाही. केवळ निवडणूक आली की, त्यांना अमरावती जिल्ह्याची आठवण येते. अभिजीत अडसूळ यांना पुन्हा केवळ आपल्या स्वार्थासाठी येऊ द्यायचं नाही असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा (ETV Bharat Reporter)



अडसुळांचा बुंदिले यांनी केला होता पराभव : 2009 मध्ये पहिल्यांदाच भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अभिजीत अडसूळ हे 4 हजार 606 मतं घेऊन निवडून आले होते. 2014 मध्ये मात्र भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली. त्यावेळी भाजपाचे उमेदवार म्हणून रमेश बुंदिले हे विजयी झाले. रमेश बुंदिले यांना 64,224 मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बळवंत वानखडे यांना 44 हजार 642 मतं पडली, तर अभिजीत अडसूळ यांना केवळ 32 हजार 255 मतं मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची पुन्हा युती झाली. त्यावेळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार म्हणून अभिजीत अडसुळ यांना उमेदवारी मिळाली होती. यावेळी मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोडून काँग्रेसमध्ये आलेले बळवंत वानखडे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बाजी मारली.



दोन दिवसात उमेदवारी जाहीर : दर्यापूरचे माजी आमदार आणि भाजपा नेता अशी ओळख असणारे रमेश बुंदिले यांनी आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. येत्या दोन दिवसात दर्यापूर विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार म्हणून रमेश बुंदिले यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं.


अचलपूरमध्ये आम्ही भाजपाच्यासोबत: लोकसभा निवडणुकीत ज्यांनी युतीधर्म पाळला नाही, अशा महायुतीतील नेत्यांसोबत आम्ही अजिबात राहणार नाही. दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ यांच्या विरुद्ध युवा स्वाभिमान पक्ष लढणार असल्यानं, अचलपूरमध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध भाजपानं प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली.

हेही वाचा -

  1. कळवा मुंब्रा मतदारसंघात गुरू शिष्याची लढाई; जितेंद्र आव्हाडांना मिळणार मोठं आव्हान?
  2. विधानसभा निवडणुकीत प्रचारात कोणते मुद्दे असणार? 'या' मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होणार?
  3. मनसेचे ९९ आमदार निवडून येणार, मनसेच्या एकमेव आमदाराचा दावा; शिवसेना परतफेड करणार का?
Last Updated : Oct 23, 2024, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details