मिरा भाईंदर : सध्या संपूर्ण राज्यात निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपाकडून आज अधिकृत पहिले ९९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मिरा भाईंदरचे उमेदवार जाहीर झालं नाहीत. मिरा भाईंदरमध्ये भाजपाकडून प्रचाराचे रणशिंगे फुकण्यात आलं आहे. भाजपा पक्षाकडून भाईंदर पश्चिमेला संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत ४० पेक्षा अधिक भाजपाचे माजी नगरसेवक, माजी महापौर जोसना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोतसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
संकल्प सभा आयोजित :मिरा भाईंदर विधानसभा तिकीटसाठी भाजपाकडून आमदार गीता जैन आणि मेहता यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्याच अनुषंगानं आपली ताकद दाखवण्यासाठी ही संकल्प सभा आयोजित करण्यात आल्याचं बोललं जातय. प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी मेहताना साथ देण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तर उपस्थित सर्वांनी मेहता यांनाच निवडून आणणार म्हणून शपथ घेतली आहे.
तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच: माजी महापौर निर्मला सावळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून तिकीट मिळण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन, भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतासह स्थानिक भाजपाचे नेते रवी व्यास इच्छुक आहेत. मात्र शहरात भाजपा पक्षावर मेहता यांची जोरदार पकड आहे. आजच्या सभेतून स्पष्ठ दिसलं की, शहरात गटबाजी असली तरी पक्ष मात्र मेहता यांच्यासोबत आहे. त्यामुळं मेहता यानाच तिकीट मिळणार असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
प्रलंबित विषय मार्गी लावणार: संकल्प सभेत अनेक व्यक्त्यांची भाषणे झाली. यामध्ये मेहता यांना पक्षाकडून तिकीट मिळणार आणि भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प केला. मेहता यांनी भाषणांची सुरुवात शेरो शायरीनी केली. शहरातील मेट्रो, पाणी, झोपडपट्टीचा प्रश्न तसेच महत्वाचे प्रकल्प थांबले आहेत ते पूर्ण करणार असा विश्वास मेहता यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे सात शिलेदार रिंगणात; 'या' दिग्गजांना मिळालं तिकीट
- भाजपाच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट, वाचा संपूर्ण यादी
- भाजपाची पहिली यादी जाहीर; पुण्यातील 'या' मतदारसंघातील पेच अजूनही कायम