महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

माहीमची जागा पडली महागात! मुंबईतील 22 जागेवर मनसेची महायुतीच्या उमेदवारांशी टक्कर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या 36 पैकी 22 विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवारांचा थेट सामना महायुतीच्या उमेदवारांशी होणार आहे.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2024, 4:04 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा मतदारसंघात राजकीय नाट्य पाहायला मिळालं. माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा करण्यासाठी सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपा नेत्यांकडूनही विशेष प्रयत्न करण्यात आले. परंतु सदा सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यांना पाठिंबा मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा एक प्रकारे झटकाच आहे. या एका झटक्याच्या बदल्यात मनसेकडून महायुतीच्या 22 उमेदवारांना झटके देण्याचा प्रयत्न मनसेकडून होणार आहे.

मनसे उमेदवारांचा महायुतीशी सामना : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत राज्यात 129 जागेवर मनसे उमेदवाराचा थेट सामना महायुतीच्या उमेदवारांशी होणार आहे. त्यात मुंबईतील 22 मतदारसंघांमध्ये मनसे उमेदवारांचा थेट सामना महायुतीच्या उमेदवारांशी होत असल्यानं येथं मनसेचे उमेदवार महायुतीचा उमेदवार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील. अनेक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार पाडू शकतील, इतकी मतं तर ते नक्कीच घेतील, असं राजकीय जाणकारांचं मतं आहे. या कारणानेच माहीममध्ये अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपानं जोर लावला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये खो घातला. त्याचा परिणाम आता निकालात दिसणार असून, मुंबईतही महायुतीला फटका बसणार आहे.

सदा सरवणकर यांच्या उमेदवारीमुळं नाराज :मनसेसोबत भाजपाची सलगी वाढत असताना आपला मुलगा अमित ठाकरेंविरोधात महायुती माहीममध्ये उमेदवार देणार नाही, अशी अपेक्षा राज ठाकरे यांना होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये खो घालत सदा सरवणकर यांची माहीममधील उमेदवारी कायम ठेवली. यामुळं राज ठाकरे कुटुंब फार नाराज झालंय. दुसरीकडे, शिवडीमध्ये मनसे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या विरोधात महायुतीनं उमेदवार दिला नाही. भाजपानं बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी पुत्र अमित ठाकरे यांना निवडून आणण्याचं मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रकारे दबाव तंत्र वापरून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहीममध्ये सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम ठेवल्यानं मुंबईतील 36 पैकी 22 मतदारसंघात मनसेचे उमेदवार थेट महायुतीच्या उमेदवारांशी लढणार आहेत.


मुंबईतील या 22 जागांवर मनसे उमेदवार महायुतीच्या उमेदवारांशी दोन हात करणार

  • माहीम
    अमित ठाकरे (मनसे)
    सदा सरवणकर (शिवसेना)
  • वरळी
    संदीप देशपांडे (मनसे)
    मिलिंद देवरा (शिवसेना)
  • वडाळा
    स्नेहल जाधव (मनसे)
    कालिदास कोळंबकर (भाजपा)
  • मागाठणे
    नयन कदम (मनसे)
    प्रकाश सुर्वे (शिवसेना)
  • कुर्ला
    प्रदीप वाघमारे (मनसे)
    मंगेश कुडाळकर (शिवसेना)
  • चांदिवली
    महेश भानुशाली (मनसे)
    दिलीप लांडे (शिवसेना)
  • भांडुप
    शिरीष सावंत (मनसे)
    अशोक पाटील (शिवसेना)
  • विक्रोळी
    विश्वजीत ढोलम (मनसे)
    सुवर्णा करंजे (शिवसेना)
  • वांद्रे पूर्व
    तृप्ती सावंत (मनसे)
    झिशान सिद्दिकी (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • चेंबूर
    माऊली थोरवे (मनसे)
    तुकाराम काठे (शिवसेना)
  • अणुशक्ती नगर
    नवीन आचार्य (मनसे)
    सना मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • विलेपार्ले
    जुईली शेंडे (मनसे)
    पराग अळवणी (भाजपा)
  • वर्सोवा
    संदेश देसाई (मनसे)
    भारती लव्हेकर (भाजपा)
  • गोरेगाव
    विरेंद्र जाधव (मनसे)
    विद्या ठाकूर (भाजपा)
  • कांदिवली पूर्व
    महेश फारकसे (मनसे)
    अतुल भातखळकर (भाजपा)
  • दिंडोशी
    भास्कर परब (मनसे)
    संजय निरुपम (शिवसेना)
  • जोगेश्वरी पूर्व
    भालचंद्र अंबुरे (मनसे)
    मनीषा वायकर (शिवसेना)
  • चारकोप
    दिनेश साळवी (मनसे)
    योगेश सागर (भाजपा)
  • बोरिवली
    कुणाल मेनकर (मनसे)
    संजय उपाध्याय (भाजपा)
  • दहिसर
    राजेश येरूणकर (मनसे)
    मनीषा चौधरी (भाजपा)
  • घाटकोपर पूर्व
    संदीप कुळवे (मनसे)
    पराग शहा (भाजपा)
  • घाटकोपर पश्चिम
    गणेश चुक्कल (मनसे)
    राम कदम (भाजपा)

हेही वाचा

  1. भांडुप मतदारसंघात कोण होणार विजयी? ठाकरे गट गड राखणार की फुटीचा फटका बसणार?
  2. भारत जोडोच्या नावाखाली समाजात अराजकता पसरवण्याचं काम- देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप
  3. देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस; संजय राऊत यांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details