मुंबई Kiran Pawaskar On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. किरण पावसकर यांनी आज (26 एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावरुन जोरदार टीका केली. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामा हा अत्यंत तकलादू आणि गुळगुळीत असा आहे. या जाहीरनाम्यात कुठल्याही शिवसैनिकांना जे बाळासाहेब ठाकरे यांचे मुद्दे अभिप्रेत होते ते मुद्दे आलेले नाहीत केवळ निवडणुका आल्या म्हणून वचननामा जाहीर करावा यासाठी जाहीर केला आहे असे दिसते. हा जाहीरनामा म्हणजे शिवसैनिकांना अपचन नावा वाटतोय. वचननाम्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भारतरत्न साठी मागणी नाही किंवा हिंदुत्वाचा उल्लेखही नाही", असं पावसकर म्हणाले.
ठाकरे यांच्यामुळं 22 उद्योग बाहेर गेले : पुढं ते म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले म्हणून तुम्ही बोलता आणि दुसरीकडे केम छो म्हणून वरळीमध्ये बॅनर लावता. कोविडमध्ये महाराष्ट्राचा नंबर एक अशी टिमकी वाजवता. मात्र, या काळात किती लोकांचे प्राण गेले आणि तुम्ही कशाकशात घोटाळे केले यावर बोला. तुम्ही अजान स्पर्धा ठेवली तशी आता टोमणे स्पर्धा ठेवायला हरकत नाही. समान नागरी कायदा विरोधात असलेल्या काँग्रेस राहुल गांधी सोबत वचननामा जाहीर केला, यातूनच नेत्याची मानसिकता कळत. तुमच्यामुळं राज्यातील 22 फार्मासिटिकल कंपन्या बंद झाल्या आणि बाहेर गेल्या युनियनच्या माध्यमातून तुम्ही किती रोजगार बंद केले याचा हिशोब द्या तेवढे रोजगार जरी तुम्ही परत सुरू केले तरी तरुणांना रोजगार द्यायचा मुद्दा तुम्हाला वचननाम्यात घ्यावा लागणार नाही, असंही ते म्हणाले.