भुवनेश्वर Mallikarjun Kharge Narendra Modi :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी, 2024 ची लोकसभा निवडणुका देशातील लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी असेल अशी भीती व्यक्त केली. भारतीय जनता पार्टी पुन्हा जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाहीकडे वाटचाल करू शकतात, असं ते म्हणाले. तसेच खरगेंनी लोकांना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते विषासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी : मल्लिकार्जुन खरगे ओडिशातील भुवनेश्वर येथे काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला संबोधित करत होते. "2024 हे वर्ष भारतातील लोकशाही वाचवण्याची शेवटची संधी आहे. नरेंद्र मोदींनी दुसरी निवडणूक जिंकली तर देशात हुकूमशाही येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबत केलेल्या युतीचा आगामी निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले. महाआघाडीतून एकादी व्यक्ती निघून गेल्यानं आम्ही कमकुवत होणार नाही. आम्ही भाजपाचा पराभव करूनच राहू", असं ते म्हणाले.