मुंबई Jitendra Awhad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक (Vidhan Parishad Election 2024) पार पडली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. हे अत्यंत दुःखदायक असून जे आमदार फुटले आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघातील जनतेने त्यांना जोड्याने मारावे अशी प्रतिक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केलीय.
आमदारांना जोड्याने मारा :यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जे आमदार फुटले आहेत ते ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो की, त्यांनी या आमदारांना जोड्याने मारावे. ज्यांना पक्षनिष्ठा सांभाळता येत नसेल, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं त्यांच्याशी जर गद्दारी करणार असाल तर ते योग्य नाही. ज्या घरात जेवता तिथेच जर नमक हरामी करणार असाल तर, अशा नमक हराम लोकांना जनतेने सोडू नये. आपणही एक आमदार आहोत हे सर्व बोलताना वाईट वाटतं. पण ज्या घरात जेवायचं तिथेच नमक हरामी करायची हे योग्य नाही. यांना धडा शिकवायला पाहिजे.