महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

भाजपाच्या बॅनरवर शिंदेंना स्थान, अजित पवारांना डावलले; राजकीय चर्चांना उधाण - Ajit Pawar photo dropped - AJIT PAWAR PHOTO DROPPED

Ajit Pawar : भाजपाने केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातबाजीमध्ये महायुतीतील एका घटकपक्षातील अजित पवारांना स्थान दिलेलं नाही. त्यांचा फोटो नसल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे.

Ajit Pawar photo dropped
भाजपाच्या बॅनरवरून अजितदादा गायब (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 1:27 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Ajit Pawar :- लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. राज्यभर पुन्हा एकदा याच योजनेची चर्चा सुरू आहे. खरं तर भाजपाने केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातबाजीमध्ये महायुतीतील एका घटकपक्षाला स्थान दिलेलं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आलाय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या शेजारीच पंतप्रधान नरेंद मोदींचा फोटो आणि बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. परंतु त्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्यानं राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.


महायुतीच्या बॅनरवरून अजित पवार गायब:खरं तर राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलीय. आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या महिलांना मदत म्हणून महिन्याकाठी दीड हजारांची आर्थिक मदत सरकारतर्फे देण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनीही या योजनेवर टीका सुरू केली होती. महायुतीतील घटकपक्षांनी विरोधकांनाही त्याच भाषेत उत्तर देऊन योजनेचे फायदे सांगितले होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा याच योजनेच्या प्रसिद्धीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणीसाठी एक बॅनर लावण्यात आलाय, या बॅनरवर देवेंद्र फडणवीस मुख्य चेहरा असून, बॅनर्सवर "देवाभाऊ" #लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला मिळणार, असा उल्लेख करण्यात आलाय. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका कोपऱ्यात स्थान देण्यात आलेय, तर दुसऱ्या कोपऱ्यात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार बॅनरवरून गायब आहेत. महायुतीत राज्यातील लाडक्या बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे, त्यातच संभाजीनगरमध्ये लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. महायुतीत अजित पवारांना स्थान नाही का? असा प्रश्न या बॅनरवरून उपस्थित केला जातोय.

अजित पवार एकटे पडलेत का?: महायुतीतील घटकपक्ष असलेले भाजपा, एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल असल्याचं बोललं जातंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मात्र बाजूला पडत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. मात्र त्यामध्ये घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला स्थान मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे आमचे "लाडके मुख्यमंत्री" तर कुठे "देवाभाऊ" अशा प्रकारचे बॅनर झळकून सत्तेमध्ये तीन पक्ष असताना दोनच पक्षांवर जास्त भर दिला जातोय. त्यामुळे अजितदादा एकटे पडत आहेत का? असा प्रश्नदेखील निर्माण होत आहे.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रात महायुती १७० पार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास, संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका - Chandrakant Patil
  2. कुणबी दाखला मिळवणं आता सोप्पं; कसं ते जाणून घ्या... - Chandrakant Patil On Reservation

ABOUT THE AUTHOR

...view details