मुंबई :आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh) दोषींना कठोर शिक्षा करा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केलीय. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली.
भेटीचं करण काय?: "मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज माझ्या विभागातील कामाबाबत संक्षिप्त स्वरुपात चर्चा करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर मी पहिल्यांदाच आज मंत्रालयात आलो होतो. माझ्या खात्यासंदर्भात दोन-तीन महत्त्वाची कामे होती. त्याबाबत मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली", अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे (ETV Bharat Reporter)
त्यावर मी बोलणं उचित नाही : आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन तुमच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच विरोधक आक्रमक झाले असून आपल्या राजीनाम्याच्या मागणीला जोर वाढत आहे. असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारला असता ते म्हणाले, "बीड हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी नेमली आहे. याचा तपास योग्य रितीने होत आहे. तपासात दोषी कोण आहेत हे समोर येईल. पण जर मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली आहे आणि तपासात माझ्याकडं संशयानं बघितलं जातं आहे. त्यावर मी बोलणे किंवा मी उत्तर देणं उचित ठरणार नाही".
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार :जे कोणी माझ्यावर आरोप करत आहेत किंवा माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तसंच महायुतीतीलच काही आमदार राजीनाम्याची मागणी करत असतील तर महायुतीतील त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारावा. माझ्यावर जे आरोप करत आहेत त्यांचं आपण तोंड धरू शकत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्याकांड : सुरेश धस यांचा मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'आका वापरायचा 17 मोबाईल फोन'
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे असल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार- मंत्री संजय शिरसाट
- संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी