नागपूर Devendra Fadnavis On Sanjay Raut : आगामी काळात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत धुसपुस सुरू झालीय. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांना कमी जागांवर समाधान मानावं लागलं, त्यांनी आतापासूनच दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केलीय.
तिन्ही पक्षांना जागा मिळतील : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळायला हव्यात अशी अपेक्षा ही बोलून दाखवली आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, की या संदर्भात सर्व घटक पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसारचं तिन्ही पक्षांना जागा मिळतील. महाविकास आघाडीत भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं भाजपाला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा देखील पूर्ण सन्मान राखला जाईल असं फडणवीस म्हणाले.
पुणे पोलीस हिट अँड रण प्रकरणाच्या मुळाशी जातील: पुणे येथील हिट अँड रण प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय सखोल तपास सुरू केला आहे. त्यामुळं या प्रकरणातील गडबड समोर आलीय. पोलीस विभागानं आरोपींचे सीडीआर काढले त्यातनंतरच लक्षात आलं की गडबड सुरू आहे. पोलिसांनी योग्य तपास करत या प्रकरणाचे धागेदोऱ्यांचा शोध घेतला आणि मुळापर्यंत गेले. त्यावेळी लक्षात आलं की, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले आहेत. परंतु दुसरे नमुने पोलिसांजवळ असल्यामुळं लगेच बाब उघड झाली. यामध्ये जे कुणी डॉक्टर सहभागी होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पूर्ण मुळाशी आणि तळाशी गेल्याशिवाय पोलीस विभाग थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले..