पुणे Devendra Fadnavis : लोकसभेत महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता विधानसभेसाठी (Vidhan Sabha Election) जोरदार तयारी सुरू केली. लोकसभेत विरोधकांनी खोटं नॅरेटीव्ह सेट केलं होतं. त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना उत्तर देण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा सल्ला दिला. पण मैदानात उतरताना 'हिटविकेट' होऊ नका, असं देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
अटलबिहारी, मोदींमुळं आरक्षण मिळालं : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी आरक्षण दिलं होतं. तो काळ संपत असताना युतीचे सरकार होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवल्याने या देशात संविधानानं दिलेलं आरक्षण सामान्य लोकांना मिळत आहे," असं म्हणत आरक्षणा मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला डिवचलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे : "राज्यात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. काही नेत्यांना वाटते हे समाज जर एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ, ते (विरोधक) केवळ राजकारण करु पाहत आहेत. सरकार येते जाते, पण समाज एकसंध राहिला पाहिजे. समाजातील दुफळी लवकर दूर होणार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाबाबतची भूमिका मांडली.
'मविआ'नं मराठा आरक्षण टिकवलं नाही : "शरद पवार यांनी का आरक्षण दिले नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे कोण म्हटले हे सर्व समाजाला माहिती आहे. आम्ही आरक्षण दिले आणि ते टिकवलेसुद्धा. पण मविआचे सरकार आले आणि त्यांनी ते टिकवले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यावर आरक्षण दिले. जरांगे यांच्या आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे? दुटप्पी भूमिका घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्सासाठी तुमचे समर्थन आहे का?" असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे. "दोन्ही समाजाला अंधारात तरी ठेवू नका. समाजाला न्याय मिळवून देण्सासाठी आमची शिव्या खाण्याची तयारी आहे. पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही," असा इशारा फडणवीसांनी दिला. आहे.Conclusion: