महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अजितदादांच्या सातारा दौऱ्याकडे राज्याचं लक्ष, फलटणसह कराड उत्तरचा घेणार आढावा - Ajit Pawar Satara Visit

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (७ ऑक्टोबर) सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते वाई खंडाळा मतदार संघात जनतेशी संवाद साधणार आहेत.

AJIT PAWAR
उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 10:56 PM IST

सातारा - वाई खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सातारा दौऱ्यावर येत आहेत. परंतु, या कार्यक्रमापेक्षा फलटणमधील राजकीय घडामोडींवर अजितदादा काय तोडगा काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचाही ते आढावा घेणार आहेत.

रामराजेंच्या नाराजीवर तोडगा निघणार का?

शरद पवारांची साथ सोडून अजितदादांसोबत गेलेल्या रामराजे नाईक निंबाळकर www यांनी भाजपच्या माण खटावमधील माजी खासदार आणि विद्यमान आमदाराविरोधात दंड थोपटले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याची तक्रार रामराजेंनी जाहीरपणे केली आहे. तसेच अजितदादांची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचे संकेतही रामराजेंनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या दौऱ्यात फलटणमधील नेत्यांच्या नाराजीवर काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

कराड उत्तरच्या परिस्थितीचा घेणार आढावा

सातारा जिल्ह्यातील वाई, फलटण आणि कराड उत्तर हे तीन मतदार संघ अजितदादांकडे आहेत. कराड उत्तर विधानसभेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. महायुतीत अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घेतली आहे. तथापि, सक्षम उमेदवाराचं नाव समोर आलेलं नाही. राष्ट्रवादीलाच ही जागा सुटली तर बाकीच्या पक्षातले इच्छुक लढायला तयार आहेत. परंतु, अजितदादांनी आपल्या समर्थकांचा कौल आजमावायचा ठरवलंय. त्यादृष्टीने संभाव्य उमेदवारांच्या नावावर देखील चर्चा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details