महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण - Rahul Gandhi Rally - RAHUL GANDHI RALLY

Rahul Gandhi Rally : दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदारांना आपापल्या पक्षाकडे वळविण्यासाठी सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावलाय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या राज्यात आज दोन ठिकाणी सभा पार पडणार आहे. त्यासाठी काँग्रे कडून जोरदार तयारी करण्यात आलीय.

Rahul Gandhi Rally
अमरावतीसह सोलापुरात राहुल गांधींची तोफ धडाडणार; दोन्ही ठिकाणी तापणार राजकीय वातावरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 11:02 AM IST

मुंबई Rahul Gandhi Rally : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत. दुसऱ्या टप्यासाठी 26 एप्रिलला मतदान तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 7 एप्रिलला मतदान होणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पहिली सभा अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बळवंत वानखेडे आणि तर दुसरी सभा सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी घेण्यात येणार आहे.

अमरावतीत सभेच्या मैदानावरुन राजकारण तापलं : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आजची पहिली सभा अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी होणार आहे. दुपारी एकच्या सुमारास परतवाडा येथील भारत जोडो यात्रा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे यांच्यात होणार आहे.

मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार?नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज सभा घेणार आहेत. आजच्या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून नवनीत राणा यांना, महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे, प्रहार पक्षाकडून दिनेश दुबे तर आनंदराज आंबेडकरही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाहा यांची सायन्स कोर मैदानावर सभा होणार आहे. मात्र, हे मैदान हे बच्चू कडू यांच्या सभेसाठी आधीच नोंदविण्यात आलं होतं. त्यामुळे अमरावतीत सभेच्या मैदानावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.



सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते यांच्यांत थेट लढत : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची दुसरी सभा सोलापूर इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी होणार आहे. माजी गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलीय. मरीआई चौकातील एक्जीबिशन मैदानात दुपारी चारच्या सुमारास सभा होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत असणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा महायुतीला होऊ नये म्हणून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतलीय. माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्यानं त्यांची ताकद वाढल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा :

  1. "भाजपा देशाचं भविष्य तर काँग्रेस भूतकाळ", उदयनराजेंचा हल्लाबोल - Udayanraje Bhosale
  2. अरे, आवाज कुणाचा? एकेकाळचे खंदे सहकारी आता कट्टर विरोधक, शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण मारणार बाजी? - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details