महाराष्ट्र

maharashtra

गणपती विसर्जनाबाबत 'फेक न्यूज' पसरवल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसांसह नितेश राणेंविरोधात तक्रार दाखल - karnataka Ganpati Fake News

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2024, 7:36 PM IST

Updated : Sep 16, 2024, 9:16 PM IST

karnataka Ganpati Fake News : कर्नाटकात गणेश विसर्जनाला (Ganpati visarjan) विरोध करण्याबाबत खोटी माहिती पसरवून दोन समाजात वैमनस्य वाढण्यासाठी कट रचला जात आहे. या प्रकारामुळं राज्यातील सामाजिक वातावरण गढूळ होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अ‍ॅड. जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Nitesh Rane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस, नितेश राणे (ETV BHARAT GFX)

मुंबई karnataka Ganpati Fake News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गणेश विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवल्याबाबत आणि फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केल्याच्या विरोधात काँग्रेसने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवी जाधव यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये (Colaba Police Station) तक्रार दाखल केली आहे.


तत्काळ कायदेशीर कारवाई करा : कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवण्यात आली होती. या फेक न्यूजच्या माध्यमातून राज्यातील दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. असा प्रकार करणाऱ्यांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. रवी जाधव यांनी केली आहे.


काय आहे प्रकरण :याबाबत, अ‍ॅड. जाधव म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निव्वळ राजकीय लाभासाठी याबाबत प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने आणि पोलिसांनी गणपती उत्सव रोखून गणेशाची मूर्ती जप्त केल्याचं विधान प्रसारमाध्यमांसमोर केलं. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेला कर्नाटक कॉंग्रेस जबाबदार असल्याची माहिती दिली. त्याशिवाय भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील या प्रकरणी खोटी माहिती दिली". या एकूण प्रकारातून दोन समाजात तेढ वाढवण्याचा व सामाजिक सलोखा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न समोर येत आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा व योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांकडं करण्यात आली.


प्रत्यक्षात काय घडले : विश्व हिंदू परिषदेने १३ सप्टेंबर रोजी बेंगळुरु येथील टाऊन हॉल परिसरात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्या आंदोलनावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती हातात घेऊन आंदोलन करत होते, त्या मुर्तीला कोणतीही इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी ती मूर्ती ताब्यात घेतली व सुरक्षित ठेवली, त्यानंतर पूजा व इतर विधि करुन त्याचे विसर्जन केले. असे असताना कर्नाटकातील कॉंग्रेसच्या सरकारने आणि पोलिसांनी गणेश उत्सवाला विरोध केला व गणेश मूर्ती जप्त केली असा आरोप करत त्यावर टीका करण्यात आली.

हेही वाचा -

  1. 'राजपुत्र' विधानसभेच्या रिंगणात? अंतिम निर्णयाची प्रतीक्षा - AMIT THACKERAY
  2. राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखाचं बक्षीस, संजय गायकवाड यांचं प्रक्षोभक विधान - Sanjay Gaikwad On Rahul Gandhi
  3. हिमंत असेल तर निवडणुका घ्या : 'त्यांचा' गद्दारीत स्ट्राईक रेट मोठा, संजय राऊत यांचा हल्लाबोल - Sanjay Raut News
Last Updated : Sep 16, 2024, 9:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details