मुंबई :हिंदू म्हणून बोलण्याची काही लोकांना लाज वाटत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच 'लाडकी बहीण' योजनेवरुनही त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातही हरियाणासारखी परिस्थिती विरोधकांची होणार असल्याचं ते म्हणाले.
मी त्यांना पुरून उरलो :'गर्व से कहो हम हिंदू है' ही गर्जना बाळासाहेबांनी दिली, पण हल्ली हे बोलण्यास काही लोकांना लाज वाटते, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी गद्दारी केली ती शिवसेना आम्ही सोडवली. आम्हाला बोलत होते की, सरकार १५ दिवसांत पडेल, मी त्यांना पुरून उरलो, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वांना ठासून दोन वर्ष पूर्ण केले. मला हलक्यात घेऊ नका, मी मैदान पळून जाणार नसल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मला हलक्यात घेवू नका : "'गर्व से कहो हम हिंदू है' ही गर्जना बाळासाहेबांनी दिली. पण, हल्ली हे बोलण्यास काही लोकांना लाज वाटत आहे. पण आम्हाला लाज वाटत नाही. बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी गड्डारी केली ती शिवसेना आम्ही सोडवली. सर्वत्र भगवा सागर दिसत आहे. आम्हाला बोलत होते की, सरकार १५ दिवसात पडेल, मी त्यांना पुरून उरलो. सर्वांना ठासून दोन वर्ष पूर्ण केले. मला हल्क्यात घेवू नका, मी मैदान पळून जाणारा नाही. मी विरोधकांना पळवून लावतो," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे. अन्यायाविरोधात पेटून उठा हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्याय झाला म्हणून आम्ही उठाव केला. जर हे केलं नसतं तर शिवसैनिकांचा अपमान झाला असता, राज्य मागं गेलं असतं," असंही मुख्यमंत्री म्हणाले.