महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"महाराजांच्या नावानं मतं मागता तर मग...."; शिवस्मारकावरून संभाजीराजे संतापले; मोदींचं नाव घेत म्हणाले... - SambhajiRaje Chhatrapati - SAMBHAJIRAJE CHHATRAPATI

अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोलत होते.

chhatrapati shivaji maharaj
छत्रपती संभाजीराजे संतापले (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 9:10 PM IST

मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन केलं. या घटनेला सात वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जलपूजन करण्यात आलं." असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपा सरकारवर केला. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोलत होते.

पोलिसांनी रोखलं :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केलं. या घटनेला सात वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही. स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे कार्यकर्ते आज (6 ऑक्टोबर) गेट वे ऑफ इंडिया परिसरात दाखल झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना समुद्रात जाण्यास नकार दिला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. "आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही रीतसर परवानगी घेतली आहे, त्यामुळं आम्हाला स्मारकाच्या कामाची पाहणी करू द्या, अशी विनंती छत्रपती संभाजी राजांनी पोलिसांना केली. "अरबी समुद्रात महाराजांच्या जल पूजनाचा दोन ते अडीच तास शोध घेतला. मात्र, आम्हाला जल पूजन झाल्याचं कुठंही दिसलं नाही," असं छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जलपूजन : "महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत पत्रव्यवहार केला, चर्चा देखील केली. मात्र, स्मारकाचा प्रश्न काही पुढे सरकला नाही. स्मारकाचं जलपूजन घाईघाईनं करण्यात आलं होतं. कारण त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते जलपूजन घाईघाईनं करण्यात आलं," असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपा सरकारवर केला.

महाराजांच्या नावानं मतांचा जोगवा : "राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन पक्ष चालवतात, हे ठीक आहे. पण, महाराजांच्या नावानं वारंवार राजकारण करणं हे गंभीर आहे. जर तुम्ही महाराजांच्या नावानं मत मागत आहात, तर महाराजांच स्मारक अजून का झालं नाही? राजकीय पक्षांनी स्मारकासाठी काहीही केलं नाही. गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मी काम करत आहे. मी माझी प्रशंशा करत नाहीय. मागील काही दिवसांपासून मी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं तिथं जतन आणि संवर्धन करत आहे. पण महाराजांच्या स्मारकाचं काय? महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला हे कळावं, यासाठी आज आम्ही पाहणी केली. पण, जलपूजन कुठंही आम्हाला दिसलं नाही. जलपूजनाच्या नावानं सरकारने लोकांची फसवणूक केलीय," अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारवर केली.

हेही वाचा

  1. कत्तलखान्यास भाजपाचा विरोध; प्रकल्प रद्द न केल्यास इमारतीवरून उडी मारू, नरेंद्र मेहता यांचा इशारा - Mira Bhayander Slaughterhouse
  2. खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक करा; माजी खासदार राहुल शेवाळेंची मागणी - MP Chandrakant Handore
  3. शिवसेनेत परतलेल्यांना शिक्षा देणार? "मुख्यमंत्र्यांचं कार्ट..." म्हणत उद्धव ठाकरेंचं श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र - Uddhav Thackeray Attacked

ABOUT THE AUTHOR

...view details