मुंबई Chandrashekhar Bawankule :आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी निवडणुकीचा जाहीरनामा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. या जाहीरनाम्यामध्ये जनतेच्या मताला स्थान असावे आणि त्यांच्या सूचनांचा आदर केला जावा यासाठी प्रत्येक राज्यातून देशभरातल्या जनतेकडून विकसित भारताबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा मागवण्यात आल्या होत्या. राज्यातील हजारो नागरिकांनी याला प्रतिसाद दिला असून या संदर्भातील सूचना भाजपा मुख्यालयाकडं पाठवण्यात आल्या आहेत.
या सूचनांचा अंतर्भाव करणार: या संदर्भात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, विकसित भारत अंतर्गत आम्ही जनतेकडून ज्या सूचना मागवल्या आहेत त्या आता आम्ही केंद्रात पाठवत आहोत. त्यांचा अंतर्भाव लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनामा मध्ये करण्यात येईल. लोकांच्या सूचना ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि चांगल्या आहेत, त्यामुळं त्यानुसारच जाहीरनामा करण्यात येईल, असंही बावनकुळे म्हणाले.
भाजपाचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांमधून- चंद्रशेखर बावनकुळे - BJP manifesto - BJP MANIFESTO
Chandrashekhar Bawankule : विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकांचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या जाहीरनाम्यासाठी देशभरातील जनतेकडून सूचना मागवल्या असून त्यांचा अंतर्भाव या जाहीरनाम्यात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.
![भाजपाचा जाहीरनामा जनतेच्या सूचनांमधून- चंद्रशेखर बावनकुळे - BJP manifesto Chandrashekhar Bawankule Says public can give suggestion for BJP manifesto](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/21-03-2024/1200-675-21041958-thumbnail-16x9-chandrashekhar-bawankule.jpg)
Published : Mar 21, 2024, 10:19 PM IST
जिंकण्याचं राजकारण करावं लागणार :पुढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागाविषयी विचारण्यात आलं असताना बावनकुळे म्हणाले की, "मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी राज ठाकरे एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आम्ही 51 टक्के मतं घेण्याचा विचार करत आहोत, त्या पद्धतीची तयारी देखील करण्यात आली आहे. शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागणार आणि त्यासाठी ज्यांच्या वाटेला जी जागा येईल ती त्यांना घ्यावी लागेल. तसंच राज ठाकरे यांचा सुद्धा उचित सन्मान ठेवला जाईल", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- Mahayuti Seat Allocation : 'मनसे'बरोबर युती? फडणवीस आणि बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...
- Bawankule On Padmakar Valvi : काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपा प्रवेश; काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार - चंद्रशेखर बावनकुळे
- Bharat Jodo Nyaya Yatra : राहूल गांधी काँग्रेस बचाव नाही, तर काँग्रेस डुबवणारे नेते, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका