महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाराष्ट्रात 'हरियाणा पॅटर्न'? पहिल्या यादीत समावेश न झाल्यानं विद्यमान भाजपाच्या १६ आमदारांची धाकधूक वाढली - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

हरियाणातील विजयाने प्रदेश भाजपामधील नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हरियाणा पॅटर्न वापरण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येतोय.

Maharashtra Assembly Election 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 10:44 PM IST

Updated : Oct 21, 2024, 10:50 PM IST

मुंबई : भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना, विद्यमान ७९ आमदारांना उमेदवारी दिली असली तरी विद्यमान १६ आमदारांची घोषणा न केल्यानं त्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडं भाजपाने पहिली यादी जाहीर करत जातीय समीकरणावर भर दिला असून राज्यात भाजपा हरियाणा पॅटर्न राबविण्याच्या तयारीत आहे.



जातीय समीकरण: भाजपाने घोषित केलेल्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत जातीचं समीकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका भाजपाला बसला होता. याच मुद्द्यावर मराठवाड्यात सर्वाधिक विद्यमान मराठा समाजाच्या आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदिवासी, ओबीसी, मराठा, भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपाने आपल्या पहिल्या यादी केल्याचं दिसून येतं. मराठवाडा १६, विदर्भात २३, उत्तर महाराष्ट्र १९, पश्चिम महाराष्ट्र १६, मुंबई १४, ठाणे ७, पालघर १, रायगड २, कोकण १.


अपक्ष आमदारही घेतले साथीला : भाजपाने विदर्भामधून सर्वाधिक कुणबी उमेदवार दिले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विद्यमान आमदारांना सर्वाधिक संधी देण्यात आली आहे. भाजपासाठी कलीच्या ठरलेल्या मराठवाड्यामध्ये मराठा उमेदवार सर्वात जास्त देत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देण्यावर भाजपानं भर दिला. भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये तीन अपक्ष आमदारांनी संधी दिली. विनोद अग्रवाल यांना गोंदिया, राजेश बकाने यांना देवळी तर महेश बालदी यांचाही समावेश आहे. पहिल्या यादीमध्ये १० मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, डॉक्टर विजयकुमार गावित, राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष)


विद्यमान आमदार वेटिंग लिस्टवर: भाजपाने अनेक विद्यमान आमदारांनाही संधी दिली नाही आहे. नागपूर मध्यमध्ये विकास कुंभारे यांची उमेदवारी घोषित केली नाही. या या मतदारसंघातून विधानपरिषद आमदार प्रवीण दटके इच्छुक आहेत. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या नावाचे घोषणा करण्यात आली नसून या जागेवर देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक सुमित वानखडे हे मागील अनेक महिन्यांपासून प्रचाराला लागले आहेत. गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या कामगिरीवर सुद्धा पक्षामध्ये नाराजगी असल्यानं त्यांचे ही नाव घोषित करण्यात आलं नाही. तीच परिस्थिती मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आणि वाशिमचे लखन मलिक, उमरखेडचे नामदेव ससाणे यांच्याबाबतीत आहे.



देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी: नाशिक मध्य मतदारसंघाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनाही उमेदवारी देण्यात आली नसून, या जागेवर माजी स्थायी समिती सभापती सुरेश अण्णा पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सोलापूरचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या उमेदवारीला स्थानिकांचा विरोध आहे. तसेच राम सातपुते हे लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून पराभूत झाले होते. पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, गेवराई लक्ष्मण पवार, खडकवासला भीमराव तापकीर यांच्याही नावाचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईतील तीन विद्यमान खासदारांचे पत्ते कापले होते. तर आता विधानसभेसाठी आमदार सुनील राणे, बोरिवली, वर्सोवा, आमदार भारती लव्हेकर, वर्सोवा, आमदार पराग शहा, घाटकोपर पूर्व यांना उमेदवारी न दिल्याने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

हेहा वाचा -

  1. महायुतीमधल्या वाशिमच्या संभाव्य उमेदवारांचं भविष्य टांगणीला, आता इच्छुकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
  2. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे सात शिलेदार रिंगणात; 'या' दिग्गजांना मिळालं तिकीट
  3. उमेदवारांच्या यादीत डावलल्यानं भाजपा नेते श्रीनाथ भिमाले नाराज, कोणती भूमिका घेणार?
Last Updated : Oct 21, 2024, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details