मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. भाजपाची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, वर्सोवातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय. लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार यांना भाजपानं संधी दिली. विशेष म्हणजे, किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
भाजपानं 146 उमेदवार केले जाहीर : भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपानं 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळं, भाजपानं 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं दिसून आलं.
सुरेश धस यांनी आष्टीतून केला उमेदवारी अर्ज दाखल : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी संदर्भात रस्सीखेच सुरू होती. अखेर सुरेश धस यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली. सुरेश धस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पुन्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी :भाजपाच्या तिसऱ्या यादीत राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपानं माळशिरस मतदारसंघातून पुन्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे. तसेच साकोलीतून अविनाश ब्राह्मणकर, तर सावनेरमधून आशिष देशमुख आणि आर्वीतून विद्यमान आमदारांचं तिकीट कापत सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
भाजपाच्या तिसऱ्या यादीतील 25 नावे -
1. मूर्तिजापूर - हरिश पिंगळे
2. कारंजा - सई डहाके
3. तेओसा - राजेश वानखेडे
4. मोर्शी - उमेश यावलकर
5. आर्वी - सुमित वानखेडे
6. काटोल - चरणसिंह ठाकूर
7. सावनेर - आशिष देशमुख
8. नागपूर मध्य - प्रविण दटके
9. नागपूर पश्चिम - सुधाकर कोहले
10. नागपूर उत्तर - मिलिंद माने