महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नवनीत राणांनी घेतले केंद्रीय गृहमंत्र्यांचे आशीर्वाद; म्हणाल्या, "भाजपा कार्यकर्ता..." - Navneet Rana met Amit Shah

Navneet Rana met Amit Shah : अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. भाजपानं अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट दिल्यानं महायुतीत वाद सुरू झाले.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 4:18 PM IST

Updated : Mar 29, 2024, 6:36 PM IST

नवी दिल्ली/मुंबई Navneet Rana met Amit Shah : देशभरात सध्या निवडणुकांचं वारं वाहतंय. उमेदवारीवरुन महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोघांमध्येही मतभेद असल्याचं दिसून आलं. यात अमरावतीची जागा हॉट स्पॉट झालीय. त्यातच शुक्रवारी भाजपा उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

अमरावतीमध्ये बंडोबा :अमरावतीच्या जागेववरुन महायुतीमध्ये वाद असल्याचं समोर आलं होतं. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांना किंवा त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आणि अमरावतीमध्ये बंडाचं राजकारण सुरू झालं. अभिजीत अडसूळ यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा गुरुवारी केली होती.

राणा यांच्याविरोधात सर्व एकत्र : 2019 मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीनं निवडूण आल्या होत्या. त्यानंतर राणा यांची विधानं ही भाजपाला पूरक होती. त्यामुळं भाजपानं 2024 च्या लोकसभेसाठी नवनीत राणा यांना थेट अमरावतीमधूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळं स्थानिक शिवसेनेचे नेते नाराज झाले. अभिजीत अडसूळ, आमदार बच्चू कडू यांनी तर थेट नवनीत राणा यांचा प्रचार करण्यास नकारच दिलाय. त्यामुळं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली.

नवनीत राणांचा भाजपा प्रवेश : लोकसभेच्या निवडणुकीत नेत्यांचे पक्षप्रवेश आणि पक्षांतर सातत्यानं होत आहेत. खासदार नवनीत राणांना भाजपाकडून प्रथम उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलंय. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरच्या कोराडी येथील निवासस्थानी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. अमरावतीमध्ये महायुतीत फूट? नवनीत राणांचा प्रचार करण्यास बच्चू कडूंचा स्पष्ट नकार, म्हणाले, "राणांविरोधात उमेदवार..." - Bacchu Kadu
  2. अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency
  3. लोकसभेची उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी पतीच्या पक्षाचा दिला राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये केला पक्षप्रवेश - NAVNEET RANA Joins BJP
Last Updated : Mar 29, 2024, 6:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details