बीड: अंजली दमानिया यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख खून प्रकरणातील जे तीन आरोपी आहेत त्यांची हत्या झाली या दमानिया यांच्या वक्तव्यावरुन पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केलं की, "मी यासंदर्भात कुठेही दावा केलेला नाही. मी जी केलेलं होतं ते विधान होतं याविषयीची सगळी माहिती पोलीस अधीक्षक यांना मी वेळेत दिली होती. हे खरं आहे खोटं, याची सविस्तर चौकशी करा अशी विनंती करण्यासाठी तसंच हे प्रकरण राजकीय आहे का, या विषयावरही सविस्तर चर्चा करण्याची मागणी मी पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्याबरोबर जो बॉडीगार्ड होता तो नेमका कोणाच्या आदेशाने दिला होता. विशेष म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर 15 तारखेला गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यांच्याबरोबर बॉडीगार्ड होता तो तुम्ही माघारी बोलवला आणि तो कशा पद्धतीने बोलवला. तसंच हा जो बॉडीगार्ड तो पेड होता की कमिटीने नेमलेला होता. याची माहिती देखील पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागितलेली आहे. ही माहिती मिळताच मी प्रसार माध्यमांना सांगणार आहे, संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास सीआयडीकडं दिल्यामुळं यावर पोलीस अधीक्षक काहीही बोलत नाहीत, मात्र बीडमध्ये एकूण पवनचक्क्या किती आहेत यामध्ये आतापर्यंत किती गुन्हे दाखल झालेले आहेत. याची सविस्तर माहिती मिळावी याच्यासाठी मी पोलीस अधीक्षक यांना भेटले आहे. आतापर्यंत किती जणांकडे खंडणी मागितली आहे, बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल केली आहे, याची देखील माहिती मागवली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर 11 तारखेला गुन्हा दाखल झाला होता. मात्र कराड 15 तारखेपर्यंत होते, या मागची काय कारणं आहेत, याचा सविस्तर अहवाल देखील पोलीस अधीक्षक यांना मागितला आहे. अशी माहिती दमानिया यांनी दिली.