महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

विधानसभेच्या प्रचारात नेत्यांची बेताल वक्तव्ये; किनवट आणि मुखेडच्या उमेदवारांची जीभ घसरली - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. त्यातच नेत्यांचं सभा आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. पण या धावपळीत नेत्यांची बेताल वक्तव्ये समोर येत आहेत.

Balaji khatgaonkar And Bhimrao Keram
बालाजी खतगावकर आणि भीमराव केराम (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 4:40 PM IST

नांदेड : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. किनवट विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. येथील भाजपाचे आमदार भीमराव केराम यांनी भर सभेत एक बेताल वक्तव्य केलं, तर मुखेड येथील अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव होते. त्यांनी देखील बेताल वक्तव्य केलं. तर आता त्यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

केराम यांच्या अडचणीत वाढ : केराम यांच्या प्रचारासाठी मंगळवारी बोधडी येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे उपास्थित असताना, आमदार भीमराव केराम यांनी एक बेताल वक्तव्य केलं. केराम गावात फिरकले नाही अशी ओरड होत असते. यावर बोलताना आमदार भीमराव केराम यांची जीभ घसरली आणि त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं. गावात येऊन काय तुमचे*** घ्यायचं का?, मंत्रालयात वेळ देऊन गावासाठी निधी आणण्याचं काम मी करतो असं ते म्हणाले. तर आता या वक्तव्यावरून केराम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सभेत बोलताना आमदार भीमराव केराम आणि बालाजी खतगावकर (ETV Bharat Reporter)



मुख्यमंत्र्याच्या माजी खासगी सचिवाची घसरली जीभ :मुखेड मतदार संघातील अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या माजी खासगी सचिवाची जीभ घसरली. एका जाहीर सभेत बालाजी खतगावकर यांनी भाजपा उमेदवाराला *** औलाद आहे का? असं संबोधित केलं. विधिमंडळात निवडून आलेले सदस्य मला बाहेरचा उमेदवार म्हणत आहेत, त्यांच डोकं ठिकाणावर आहे का?, गुडघ्यात मेंदू आहे का? अशी जहरी टीका अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी आमदार तुषार राठोड यांचं नाव न घेता केली.



हेही वाचा -

  1. गौतम अदानींसोबत शरद पवारांची बैठक ही वस्तुस्थिती; मंत्री हसन मुश्रीफांनी केली अजित पवारांची पाठराखण
  2. निवडणुकीनंतर अजित पवारच किंगमेकर, आमच्या अटी अन् शर्थीनुसार सरकारमध्ये सहभाग होणार- नवाब मलिक
  3. अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही; देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न, माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा खळबळजनक दावा

ABOUT THE AUTHOR

...view details