महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

मोदी यांच्या कार्यकाळात मुस्लिम समाजावरील अत्याचार वाढले; असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया - ASADUDDIN OWAISI - ASADUDDIN OWAISI

Asaduddin Owaisi : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर होते. त्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल मतं व्यक्त केलं आहेत.

Asaduddin Owaisi On PM Modi
असदुद्दीन ओवैसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:16 PM IST

संभाजीनगर (औरंगाबाद) Asaduddin Owaisi :मराठा समाजासाठी उभारलेल्या लढ्याबद्दल मी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं अभिनंदन करतो, त्यांच्यामुळं 8 खासदार निवडून आले. पण महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समजाचे उमेदवार जिंकतात पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही. जलील निवडून आले नसल्यानं महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याच दुःख आहे. मुस्लिम लोक सर्वांना मतदान केलं, मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. मोदी यांच्या कार्यकाळात मुस्लिम समाजावर अन्याय वाढले असल्याचा आरोप, एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलाय.

प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवैसी (ETV BHARAT Reporter)



अल्पसंख्याक समाजासाठी मोदींनी कायदा करावा : मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी. मुस्लिम समाजाला बॉम्बे हायकोर्टाने देखील ५ टक्के आरक्षण देण्यासाठी मान्यता दिली होती. मात्र ते झाले नाही. देशात मुस्लिम समाजाची अवस्था सर्वात वाईट आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं आता नवीन कायदा आणून मुस्लिम समाजाला देखील आरक्षण द्यावं अशी मागणी, एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलीय. मनोज जरांगे प्रस्ताव आला तर पत्रकार यांना सोबत घेऊन जाऊन चर्चा करेल. बीडमधून जरांगे यांच्यामुळं पंकजा मुंडे पडल्या, त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही?, महाराष्ट्र ११ टक्के मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलणं होत असेल तर नक्की बोलू असं त्यांनी स्पष्ट केलंय.



देशात मुस्लिम समाजावर अन्याय वाढले : भाजपा विरोधात ममता बॅनर्जी यांना साथ देताल का? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, देशात सर्वाधिक अत्याचार मुस्लिम समाजावर होत आहेत. काही ठिकाणी बुलडोझर फक्त मुस्लिम लोकांच्या घरावर चालते, निशांण्यावर आम्ही आहोत, आम्हीच फक्त भाजपाचा विरोध करत आहे. त्यांना विचारा भीमा कोरेगावत जीव गेले, त्याचं काय? उद्या विरोध करण्याचा मुद्दा आल्यास भाजपाला आम्ही विरोध करणार आहोत. महाराष्ट्र एका मुस्लिम उमेदवार दिला नाही, आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मते दिले पण आमचा उमेदवार पाडला. आमचा समाज फक्त मत देणारा होणार का? घेणारा नाही होणार का? असा प्रश्न यावेळी ओवैसी यांनी उपस्थितीत केलाय.



आमचा पक्ष कोणाला पाडण्यासाठी नव्हे: आमचा पक्ष कोणाला पाडण्यासाठी उभा राहत नाही, आमची एक वेगळी विचारधारा आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतो. निवडणूक ही राजकीय आखाड्यासारखे असते. मात्र, त्यामुळं आमच्यावर कोणाला पाडण्यासाठी उभे राहिलो असे आरोप करणे चुकीचे आहे. याउलट राज्यात सगळीकडून आमच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील इम्तियाज जलील यांना पाडण्यासाठी सगळे एकवटले होते. आगामी काळात राज्यातील राजकारणात इम्तियाज जलील महत्त्वाची भूमिका निभवतील. तर यावेळी लोकसभेत शपथ घेत असताना सर्वांनी माझं कौतुक केलं. मात्र, त्यावेळी मी इम्तियाज जलील यांना मेसेज करून तुमची खूप आठवण येते अस सांगितलं. आम्ही दोनच खासदार होतो, मात्र सर्वांना भारी पडत होतो. मागची पंधरा वर्षे एकटा लढा देत होतो आणि यापुढेही देत राहील असंही असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. भाजपाला हटवण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा - असदुद्दीन ओवैसी - Lok Sabha Election 2024
  2. Owaisi Criticized Thackeray : विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाल्याने ओवैसींनी उद्धव ठाकरेंना सुनावले खडेबोल
  3. MP Owaisi On Kerla Story : हिटलरचे उदाहरण देत ओवैसींची 'केरल स्टोरी'वरून टीका; म्हणाले, मोदी चांगले....

ABOUT THE AUTHOR

...view details