महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

संजय राऊतांच्या दाव्यानंतर भाजपासह काँग्रेस उमेदवारही आक्रमक; वाद चिघळण्याची शक्यता - Anil Deshmukh on Sanjay Raut

Anil Deshmukh on Sanjay Raut: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. या आरोपानंतर भाजपासह काँग्रेस उमेदवारही आक्रमक झाले आहेत.

Anil Deshmukh on Nitin Gadkari
नितीन गडकरी आणि अनिल देशमुख (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 10:54 PM IST

नागपूर Anil Deshmukh on Sanjay Raut :नागपूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची यंत्रणा कामाला लागली होती असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातून केलाय. संजय राऊत यांच्या दाव्यानंतर भाजपाचे नेते तर आक्रमक झाले आहेत. मात्र, याशिवाय नितीन गडकरी यांच्या विरोधात जे निवडणूक रिंगणार आहेत असे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

प्रतिक्रिया देताना विकास ठाकरे आणि अनिल देशमुख (ETV BHARAT Reporter)

वाद चिघळण्याची शक्यता :संजय राऊत यांची तक्रार हायकमांडकडं करणार असं आमदार विकास ठाकरे म्हणाले तर, दुसरीकडं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजय राऊत यांनी आज केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं म्हटलंय. एकंदरीत संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळं भाजपा आणि उबाठा गटातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




राऊत यांनी भान ठेवून बोलावं: संजय राऊत यांनी सामनात जे काही लिहिलंय त्यावरून त्यांचं गडकरी यांच्यावर त्यांचं जास्त प्रेम आहे असं दिसून येतंय. हे प्रेम असताना आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं. त्यांच "प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावा" असं लिखाणातून दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल. महाविकास आघाडीकडून दररोज भाजपावर आरोप करता आणि दुसरीकडं नितीन गडकरी यांच्या बाजूनं बोलता. म्हणून त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं नाहीतर बोलण्यासाठी सगळेच मोकळे आहेत. याबद्दल मी हायकमांडकडं तक्रार करणार करणार असं देखील विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.




भाजपाचा अंतर्गत वाद : नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणूकीत पराभूत करण्यासाठी कोणी प्रयत्न केले संपूर्ण नागपूरला माहित असल्याचा दावा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. महाविकास आघाडी सर्व एकत्र येऊन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवत होते. सर्वांनी एकत्र येऊन काम केलं. भाजपाचा अंतर्गत वाद आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम केलं हे सगळ्यांना माहिती आहे, चर्चेचा विषय आहे असं अनिल देशमुख म्हणाले आहे. हा भाजपाचा अंतर्गत वाद आहे, त्यात गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे गट वेगवेगळे आहेत असंही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी आकलेचे तारे तोडले : उबाठागटाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलंय. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावे. भाजपा हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'x' च्या माध्यमातून लावला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळं राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार असं देखील ते म्हणाले.


राऊत यांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला: 2019 मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या! असं आवाहन बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.

हेही वाचा -

  1. अनिल देशमुखांचा गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा; म्हणाले"निवडणुकीच्या काळात..." - Devendra Fadnavis
  2. फोडाफोडीसाठी भाजपाकडून साम, दाम आणि दंडाचा वापर– अनिल देशमुख - Anil Deshmukh On BJP
  3. तुतारीचा पराभव निश्चित असल्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, खासदार तटकरे यांच्याकडून आमदार अनिल देशमुख यांचा निषेध - MP Tatkare Criticized Anil Deshmukh

ABOUT THE AUTHOR

...view details