सभेत बोलताना डॉ. अमोल कोल्हे पुणेLok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झालीय. त्यातच आज शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मंचावर आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला.
कोल्हे आणि आढळराव आमने सामने : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज राजगुरूनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी वाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमने सामने आले होते. अमोल कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा, आढळराव पाटील यांचं भाषण सुरु होतं. त्यांचं भाषण संपताच कोल्हे यांनी आढळराव यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर उपस्थित जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली. आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्त्वाची असल्याचं मत मांडलं. निवडणुका आणि पदं येत-जात राहतात. पण त्यातला माणूस टिकला पाहिजे, हीच भगवंतांची शिकवण असल्याचं मांडणी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केली.
विचार करुन मतदान करा : "देश पुढच्या पाच वर्षांत कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. 2014 ला गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलेंडरच्या पाया पडा आणि आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलेंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळं तीन वेळा पाया पडा, मग विचार करुन मतदान करा. जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो. देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा," असं आवाहन डॉ. कोल्हे यांनी केलंय.
काय म्हणाले आढळराव पाटील: यावेळी भाषणात आढळराव पाटील म्हणाले की, वाडा येथे हभप रोहिदास महाराज हांडे यांच्या वाणीतून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्तानं काल्याचं कीर्तन पार पडलं. आपल्या संस्कृतीची शिकवण देणारं त्यांचं वक्तव्य अत्यंत मौल्यवान होतं. आपल्या वाड्याची लेक, शिवांजली शंकर कदम यांची मंत्रालयात नेमणूक झाल्याबद्दल आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांशी प्रचारासंबंधित संवाद साधला असता, संपूर्ण गावाच्या वतीनं महायुतीसाठी आपला पाठिंबा जाहीर करत, महायुतीचं समर्थन ग्रामस्थांनी केल्याचं आढळराव यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
- 'अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल'; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? - Lok Sabha Election
- "महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला मोदींचाच राजाश्रय", पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप - Prithviraj Chavan