महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"फडणवीसांनी एकदाही अजित पवारांचा उल्लेख...", अमोल कोल्हे यांची जोरदार टोलेबाजी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Amol Kolhe On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंदापूर येथील सभेत एकदाही अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला नाही, असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी (Amol Kolhe) अजित पवारांवर टीका केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

Amol Kolhe says Devendra Fadnavis did not mention name of Ajit Pawar even once in meeting in Indapur
देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे, अजित पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 10:54 PM IST

अमोल कोल्हे पत्रकार परिषद

पुणे Amol Kolhe On Ajit Pawar : पुण्यात आज (6 एप्रिल) शिरूर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलत असताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. तसंच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही खिल्ली उडवली.

नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे? :यावेळी बोलत असताना अमोल कोल्हे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी (5 एप्रिल) इंदापूर येथे सभा पार पडली. मात्र, या सभेतील भाषणादरम्यान फडणवीसांनी एकदाही उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा एकदाही उल्लेख केला नाही. तसंच महायुती महाराष्ट्रात टिकेल की नाही याबाबत संभ्रम आहे. महायुतीत स्वतःला दिग्गज म्हणवणाऱ्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची काय अवस्था होत आहे, हे आपण पाहतोय", अशी टीका कोल्हे यांनी केली.


निवडणुकीसंदर्भात काय म्हणाले? : पुढं निवडणुकीसंदर्भात बोलत असताना कोल्हे म्हणाले की, महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष एकजुटीनं प्रचार करत आहेत. जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे. तसंच महायुती विरुद्ध जनता अशी ही निवडणूक होत असल्याचंही कोल्हे म्हणाले. पुढं आढळराव पाटील यांच्यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "आढळराव पाटलांनी 15 वर्षांमध्ये आणलेल्या निधीचा लेखाजोखा द्यावा. त्यांनी माझंही कौतुक करावं, मी देखील देखील पहिल्यांदाच इतका मोठा निधी आणलाय. तसंच त्यांनी आणलेला एक मोठा प्रकल्प दाखवावा. मग आम्ही याविषयी बोलू."

हेही वाचा -

  1. शिरूरमधून अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, उमेदवारीनंतर काय म्हणाले कोल्हे; पाहा व्हिडिओ - Shirur Lok Sabha
  2. लोकसभेत एकमेकांविरोधात, मात्र समोर येताच अमोल कोल्हेंचा आढळराव पाटीलांना पाया पडून नमस्कार! - Shirur Lok Sabha Constituency
  3. MP Amol Kolhe : "ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते त्यांना दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आलीय", अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details