महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

ऐतिहासिक वास्तूंच्या नुकसानीनंतर 2 वर्षांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाने घेतले 41 निर्णय - State Cabinet Meeting Decision - STATE CABINET MEETING DECISION

आजच्या बैठकीत 41 निर्णय घेण्यात आलेत. यात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आलीय.

State Cabinet Meeting
मंत्रिमंडळ बैठक (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2024, 6:28 PM IST

मुंबई :विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच आज (शुक्रवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या आठवड्यात सलग दुसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारकडून निर्णयाचा धडाका सुरू झालाय. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 निर्णय घेण्यात आले होते. तर आजच्या बैठकीत एक दोन नाही तर तब्बल 41 निर्णय घेण्यात आलेत. यात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आलीय. यासह अनेक महामंडळांना मान्यता देखील देण्यात आली आहे.

आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?

- राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
- महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
- दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता
- टेंभू उपसा सिंचन योजनेस स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे नाव
- पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार, सिल्लोडमधील जमिनीला सिंचन मिळणार
- प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
- राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली
- राज्यातील आणखी 104 आयटीआय संस्थांचे नामकरण
- संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
- लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरण धोरण
- कोकण, पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या स्थापन होणार
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
- राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार
- जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
- महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना
- आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
- बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्येची अट शिथिल करणार
- कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
- महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
- कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव होणार
- बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार 2604 कोटीस मान्यता
- राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार 1 लाख 60 हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित
- उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
- राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण होणार
- शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
- बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना देणार
- सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
- वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
- डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
- रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकुल अनुदानात वाढ

हेही वाचाः

ABOUT THE AUTHOR

...view details