मौनी रॉयनं बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.. मौनी रॉय पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील आहे.. मौनीनं जामिया मिलिया इस्लामियामधून मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला होता. मात्र तिनं हे शिक्षण अर्धवट सोडलं.. मौनी रॉयनं नशीब आजमावण्यासाठी मायानगरी मुंबई गाठलं.. बऱ्याचं धडपडीनंतर तिला हिरोईन नव्हे तर बॅकग्राउंड डान्सर बनण्याची संधी मिळाली.. मौनी रॉयनं टीव्ही मालिकेसाठी ऑडिशन्स दिलं आणि तिला एकता कपूरचा लोकप्रिय शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मध्ये काम करण्याची संधी मिळाली.. या मालिकेत मौनीनं कृष्ण तुलसीची भूमिका साकारली होती.. यानंतर मौनीला एकता कपूरचा 'नागिन' शो मिळाला.. नागिननंतर तिला दुसरा शो 'देवों के देव महादेव'नं लोकप्रियता मिळवून दिली.. यानंतर मौनी 'झलक दिखला जा'. 'नच बलिए'. 'कस्तुरी' यासह अनेक टीव्ही शोमध्ये दिसली.. मौनी रॉयनं अक्षय कुमारबरोबर 'गोल्ड' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.. मौनी रॉय गेल्या वर्षी अयान मुखर्जीचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र'मध्येही दिसली होती.