मानुषी छिल्लरनं २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता.. मिस वर्ल्डचा हा किताब 17 वर्षांनंतर भारतात आला होता. मानुषीच्या आधी प्रियांका चोप्रानं 2000साली मिस वर्ल्ड बनली होती.. मानुषी छिल्लर ही एक कुचीपुडी नृत्यांगना आहे.. मानुषी छिल्लर ही हरियाणातील रोहतकची रहिवासी आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय आहे.. मानुषीचे वडील डॉ. मित्र बसू छिल्लर हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये शास्त्रज्ञ आहेत.. याशिवाय तिची आई न्यूरोकेमिस्ट्री विभागाची प्रमुख आहे.. मानुषीनं नवी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केलं आहे. ती 12वी मध्ये CBSE बोर्डातून इंग्रजीमध्ये ऑल इंडिया टॉप झाली आहे.. तिनं मिरांडा हाऊसमध्ये वर्षभर शिक्षण घेतल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट पास केली .. त्यानंतर तिनं सोनीपतमध्ये एमबीबीएसचा अभ्यास सुरू केला.. मानुषी छिल्लरनं अक्षय कुमारबरोबर 'पृथ्वीराज' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.. मानुषी छिल्लर आणि वरुण तेजबरोबरच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.. मानुषी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे.