वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.. अभिनेता सुबोध भावेनं कसबा मतदारसंघाकरिता पुण्यात मतदान केले.. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजाविला.. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी संपूर्ण परिवारासह बजावला मतदानाचा हक्क बजाविला.. राज्यपाल रमेश बैस यांनी मतदानाचा हक्क बजाविला.. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह पत्नी सीमा गोयल. मुलगा ध्रुव गोयल यांनी मलबार हिल येथील वॉलसिंघम हाउस स्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला.. तेजस ठाकरे यांनी चारचाकीतून जाताना मतदानाचा अधिकार बजावल्याची खूण दाखविली आहे.. भारतरत्न सचिन तेंडुलकरनं पूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजाविला.. भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजाविला.. दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरनं मतदान केंद्रावर आणण्यात आलं.. अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल तसेच निर्माता राकेश रोशन यांनी मुंबईत मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर फोटो काढले.. शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी मतदानाचा हक्क बजावला.. भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे मतदान केले.. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी मतदानाचा हक्क बजाविला.. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला.