अभिनेत्री अनुष्का शर्माला सुरुवातीला पत्रकार व्हायचं होतं.. याशिवाय तिला मॉडेलिंगमध्येही रस होता.. अनुष्कानं मॉडेलिंग करिअरला फक्त एक वर्ष दिलं.. यानंतर तिला शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली.. 2008 मध्ये रिलीज झालेला 'रब ने बना दी जोडी' हा तिचा पहिला चित्रपट होता.. 2010 मध्ये अनुष्काचे 'बदमाश कंपनी' आणि 'बँड बाजा बारात' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले.. अनुष्काची गणना टॉप अभिनेत्रींमध्ये होऊ लागली.. अनुष्कानं बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे.. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये विवाह केला.. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 12 जानेवारी 2021 रोजी मुलगी वामिकाचे स्वागत केले.. अनुष्का बरेचदा विराट कोहलीचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी जात असते.. अनुष्का आता चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही. मात्र ती बरेचदा आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.