हैद्राबादPakistan Elections Result: पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकाच्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय आहे. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षानं निवडणूक जिंकल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडं तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांनीही X या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा काय आहे निकाल? सत्तास्थापनेचे काय गणित? याबद्दल आपण माहिती घोणार आहोत.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी प्रथम इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक इन्साफचं (पीटीआय) समर्थन केलेल्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिल्याचं दिसून आलं आहे. पीटीआयच्या नेत्याला तुरुंगात टाकून, पक्षाला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. पीटीआय पक्षाचं चिन्ह काढून घेण्यापासून तर, इम्रान खान यांना 20 वर्षे तुरुंगात टाकण्याच्या प्रकरणांमध्ये पीटीआयला निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सैन्यदलाच्या नेतृत्वाखालील जोरदार प्रयत्नांनंतरही इम्रान यांच्या पक्षाच्या पारड्यात लोकांनी भरघोस मत टाकली आहेत. याबात पाकिस्तानच्या आघाडीच्या असललेल्या माध्यमानं सैन्यदलावर कडाडून टीका केली. त्या माध्यमानं म्हटलं की, " सैन्यदलानं हे लक्षात घेतलं पाहिजे की नागरी व्यवहारात हस्तक्षेप करणं आता मतदारांना मान्य नाही." या निकालांच्या धक्क्यानं सैन्याला धक्का बसला असेल. परंतु पीटीआयच्या नेतृत्वाखालील अपक्षांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधक सर्व प्रयत्न करतील असं दिसंतय.
पैशांची ऑफर देऊन घोडेबाजार -निवडणुकीत पीटीआयच्या समर्थित अपक्ष उमेदवारांनी 92 जागा जिंकल्या आहेत. तर, पाकिस्तान मुस्लिम लीगच्या उमेदवारांना 71 जागांवर समाधान मानावं लागलंय. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल (एन) तसंच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी बहुमताचा दावा केला आहे. तसंच त्यांनी पाकिस्तानात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. निवडणूक लढवलेल्या तसंच जिंकलेल्या अपक्षांना मोठ्या पैशांची ऑफर देऊन घोडेबाजार केल्याच्या बातम्या पाकिस्तानमधील माध्यम देत आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानमध्ये कथित अनियमिततेच्या मतदानाचा निषेध केला आहे. पीटीआयनं इम्रान खानच्या पदच्युतीला पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दिल्याचा आरोप केला असला तरी, अमेरिका, ब्रिटन, ईयूनं 8 फेब्रुवारीच्या मतदानाच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुका कशा आयोजित केल्या, याचा आंतराष्ट्रीय समुदायानं पुरावा मागितला आहे.