हैदराबादGoods And Service Tax : भारतातील सामान्य कर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी म्हणून ओळखला जातो. त्यामुळं देशाला अप्रत्यक्ष कर, सेवा कर, विक्री कर उत्पादन शुल्कासाठी एक समान बाजारपेठ बनवलंय. या वर्षी कर संकलनानं एक महत्त्वाचा टप्पा पार केला. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनामुळं 2.1 लाख कोटी रुपयांचा निधी देशाच्या खात्यात जमा झाला आहे.
आतापर्यंतचा सर्वाधिक कर जमा : स्वातंत्र्यानंतर, वैयक्तिक आयकर, कॉर्पोरेट कर यांसारख्या प्रत्यक्ष करांच्या बाबतीत भारत एकच बाजारपेठ होता. तथापि, अप्रत्यक्ष कर, सेवा कर, विक्री कर, मूल्यवर्धित कर (व्हॅट), उत्पादन शुल्क, वस्तूंच्या उत्पादनावर केंद्राकडून आकारला जात होता. विविध राज्ये तसंच केंद्र सरकार स्वतंत्रपणे कर आकारत होते. ज्यामुळं देशात विविध राज्याच्या कर प्रणालीचं पालन करणे व्यवसायांसाठी कठीण होतं. कारण विविध राज्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे विविध कर लावले होते. त्यामुळं व्यावसायीकांना कर भरताना अडचण निर्माण होत असे.
त्यावर मात करण्यासाठी भाजप सरकारनं नवी कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्ये आणि केंद्रानं देशाच्या घटनेत सुधारणा करून राष्ट्रव्यापी कर संयुक्तपणे लागू करण्यासाठी सरकानं नविध विधेक आणलं होतं. 1 जुलै 2017 रोजी नवीन GST कायदे लागू करण्यात आले. या देशव्यापी सामान्य GST नं पेट्रोलियम उत्पादनं, अल्कोहोल उत्पादनला अप्रत्यक्ष करात समाविष्ट केलंय. या अप्रत्यक्ष करांमुळं कर भरण्यात सुलभता आलीय. तथापि, इतर कोणत्याही कर सुधारणांप्रमाणे, GST कराला देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यामुळं विरोधी पक्षांनी जीएसटी विधेयक घाईघाईनं लागू केल्याबद्दल सरकारला दोषी ठरवलं होतं.