राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) -2020 मध्ये एक वैशिष्ट्य म्हणून मल्टीपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट (MEME) धोरण सादर करण्यात आलं होतं. ज्याचा उद्देश शिक्षणाला अनुकूल, सर्वसमावेशक, वैविध्यपूर्ण, कौशल्य-केंद्रित, लवचिक आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी मिळतं-जुळतं करणं हा होता. NEP 2020 इतर गोष्टींबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांची निवड आणि शैक्षणिक मार्ग या बाबतीत लवचिकता प्रदान करून उच्च शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. यातून शिक्षणात अनेक प्रवेश सोडण्याचे पर्याय उपलब्धतेचं नियोजन सादर केलं होतं. यासंदर्भातील सर्जनशील संयोजन हे NEP, 2020 च्या प्रमुख शिफारशींपैकी एक आहे, असं तत्कालीन राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
एलुरुचे (आंध्र प्रदेश) खासदार श्रीधर कोटागिरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की, सरकार अनेक क्षेत्रांमध्ये MEME व्यवस्थापित करण्यात अडथळे दूर करण्यासाठी NEP मध्ये मल्टीपल एंट्री आणि मल्टीपल एक्झिट (MEME) साठी नवीन पर्याय विकसित करण्याचा विचार करत आहे का. यासंदर्भा अधिक चांगल्या प्रकारे माहिती समजून घेण्यासाठी एमईएमई संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केलेल्या सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांचाही सरकारनं उत्तरात संदर्भ दिला होता.
नेमके काय साध्य करायचे आहे? - UGC च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, त्याच्या उद्दिष्टांच्यात, MEME ची कारणे म्हणून सात प्रमुख पैलूंची यादी दिली आहे. त्यात म्हटलय की, शिकणाऱ्यांसाठी अनावश्यक सीमांची बंधनं शिथील करुन नवीन शक्यतांचा मार्ग सुकर केला जाईल. तसंच शिक्षणातील गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि GER (एकूण नोंदणी प्रमाण) सुधारण्यासाठी उपाय करण्यात येतील. एमईएमई अभ्यासाच्या विषयांचं सर्जनशील संयोजन करील. यात शिस्तबद्ध विशिष्ट स्पेशलायझेशन आणि मास्टर्स प्रोग्रामच्या विविध डिझाइन्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम पर्यायांमध्ये लवचिकता देखील प्रदान करेल.
यातून क्रेडिट प्रणाली आणि हस्तांतरणाची तरतूद असेल आणि पदवीसाठी अनौपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाचं मूल्यांकन आणि प्रमाणीकरण करेल आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देईल. तसंच जेव्हा शिकणाऱ्यानं त्याचा/तिचा अभ्यासाचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला असेल तेव्हा आधीच्या क्रेडिट्सची नोंद घेतली जाईल. केंद्र सरकार राज्यांमध्ये NEP अंमलबजावणीच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी जोरदार प्रयत्न करत असताना, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये (HEIs) MEME पर्यायाची अंमलबजावणी ही एक अशक्यप्राय गोष्ट वाटू शकते. यातील अनेक अडथळ्यांची चर्चा करूया.
अभ्यासक्रमाची पुनर्रचना - लवचिक आणि मॉड्यूलर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करणे आवश्यक आहे आणि पारंपरिक पदवी कार्यक्रमांना लहान-लहान भागात वाटून प्रमाणपत्रे आणि डिप्लोमामध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहे. यातून विद्यार्थ्यांना विविध टप्प्यांवर एखादा अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यातून बाहेर पडण्याची आणि पुन्हा पुढील भागात प्रवेश करण्याची सुविधा असावी. विद्यमान निश्चित संरचना आणि दीर्घ अभ्यासक्रम असलेल्या संस्थांसाठी हे एक गुंतागुंतीचं काम आहे.
क्रेडिट ट्रान्सफर सिस्टिम - MEME एका मजबूत शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सवर (ABC) अवलंबून आहे, जिथे विद्यार्थी सर्व संस्थांमध्ये क्रेडिट्स (श्रेणी) जमा आणि हस्तांतरित करू शकतात. त्यासाठी सर्वसमावेशक आणि पारदर्शक क्रेडिट हस्तांतरण प्रणाली विकसित करणं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर ही प्रणाली सर्वत्र स्वीकारली गेली पाहिजे, याचीही काळजी घ्यावी लागेल. याशिवाय, विविध विद्यापीठं त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या विषयांसाठी वेगवेगळ्या क्रेडिट सिस्टमचा अवलंब करतात. एखाद्या विषयासाठी क्रेडिट वेटेज राष्ट्रीय स्तरावर सर्व HEI मध्ये समान असू शकत नाही. याचाही सर्वांगानं विचार करावा लागेल.
'शिक्षक प्रशिक्षण आणि प्रशासकीय आव्हाने' - शिक्षकांच्या कमतरतेमुळं आधीच मर्यादित असलेल्या एचईआयना नवीन शिक्षण पद्धती आणि मूल्यमापन पद्धतींशी जुळवून घेणं आवश्यक आहे. जी पारंपरिक मॉडेलपेक्षा अगदीच भिन्न असू शकते. शिवाय, वेगवेगळ्या वेळी प्रवेश करणारे आणि बाहेर पडणारे विद्यार्थी व्यवस्थापित केल्यानं प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढू शकतो. ज्यामुळं वैयक्तिक लक्ष देणं अधिक कठीण होतं. अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची वारंवार होणारी ये-जा लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणेला अधिक काम करावं लागेल, जसं की विद्यार्थ्यांच्या नोंदींचं व्यवस्थापन, फी संरचना आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्याची पद्धत. या गुंतागुंतीचं व्यवस्थापन करण्यासाठी संस्थांना तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो बदल करावा लागेल.
उच्चशिक्षण संस्थांकडे (HEI) पायाभूत सुविधांचा अभाव - HEI ची आर्थिक परिस्थिती, विशेषत: राज्य अर्थसहाय्यित विद्यापीठे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ आणि पगार देण्यासाठी संघर्ष करत आहेत, हे लपून राहिलेलं नाही. लवचिक अभ्यासक्रम प्रदान करण्यासाठी पायाभूत सुविधा (हार्ड आणि सॉफ्ट दोन्ही) उदा. अतिरिक्त विद्याशाखा, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, कार्यशाळा आणि प्रशासकीय समर्थन आवश्यक आहे. संसाधनांचा विचार करता HEI ला MEME साठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करणं आव्हानात्मक वाटू शकतं.
HEIs बद्दल सरकारची उदासीनता यातून परिस्थिती अधिक बिकट होऊन जाते. त्यानंतर नोकरीतील नियमांच्यातही नवीन शिक्षण पद्धती कशी स्वीकारली जाईल याचाही विचार करावा लागेल. MEME शिक्षण प्रणालीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे किंवा डिप्लोमा मिळविण्याची परवानगी देत असताना, त्यांची प्रमाणपत्रे स्वीकारली जातील की नाही हे अनिश्चित आहे. विशेषत: व्यावसायिक क्षेत्रात जेथे पारंपरिकपणे पूर्ण पदवीची आवश्यक आहे.
पुढे काय... - या सगळ्या गोष्टींच्या निरीक्षणांमधून असं दिसून येतं की, MEME प्रणालीमध्ये उच्च शिक्षणामध्ये लवचिकता आणि प्रवेश सुधारण्याची क्षमता असली तरी, अंमलबजावणीसाठी विद्यमान प्रणाली, मानसिकता आणि संसाधनांची महत्त्वपूर्ण पुनर्रचना आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, सर्व HEI मध्ये एकसमान अभ्यासक्रम आणि क्रेडिट योजना धोरण आवश्यक आहे, जे त्यांच्या स्वायत्ततेशी तडजोड करते. तसंच विद्यापीठांकडून त्याचा प्रतिकार होऊ शकतो. स्लेजहॅमर पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी, प्रारंभिक टप्प्यात, काही मर्यादित पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये एमईएमई लागू करणं अत्यावश्यक आहे, जेथे नावनोंदणी तुलनेने कमी आहे. अश पद्धतीनं एक पायलट प्रोजेक्ट राबवून त्यानंतर घेतलेल्या धड्यातून शिकून काळजी घेत भविष्यातील कृती कार्यक्रम ठरवता येईल.
हेही वाचा..
Jagdeep Dhankhad On Education Policy : नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर ठरणार : उपराष्ट्रपती