वॉशिंग्टन Who is Usha Chilukuri Vance :रिपब्लिकन पक्षानं पक्षानं राष्ट्रीय अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली. ट्रम्प अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. त्यांनी ओहायोचे खासदार जेडी व्हॅन्स यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केलीय. अशा प्रकारे या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि व्हॅन्स यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांशी स्पर्धा होईल.
- जेडी व्हॅन्स हे ट्रम्प यांचे टीकाकार असल्यामुळं त्यांना उपराष्ट्रपती बनवण्याचा निर्णय खूपच आश्चर्यकारक होता. व्हॅन्स यांचं भारताशी अत्यंत जवळचे नाते आहे. त्यांचा विवाह मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या उषा चिलुकुरीशी यांचा विवाह झाला.
कोण आहेत उषा व्हॅन्स? :लेखक, तत्कालीन रिपब्लिकन सिनेटर आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्सची साथ लाभली. उषा चिलुकुरी या हिंदू धर्मीय आहेत. तर त्यांचे पती जेडी व्हॅन्स हे रोमन कॅथलिक आहेत. भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांचे बालपण सॅन दिएगो शहरात गेले. कॉलेजनंतर त्यांनी येल येथून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.