लंडन UK Election 2024 : ब्रिटनच्या संसदेत सर कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षानं जोरदार घोडदौड केली आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला. ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षानं आपला पराभव मान्य केला आहे. सर कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षानं 650 पैकी 326 जागा जिंकल्या असून ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षाला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं स्पष्ट केलं.
ब्रिटनच्या संसदेत 'सिंह आला पण गड गेला' :ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हूजूर पक्षाला केवळ 80 जागा मिळाल्यानं त्यांचा पराभव निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत ऋषी सुनक यांनी त्यांची जागा जिंकली आहे. ऋषी सुनक यांचा विजय झाला असला, तरी पक्ष हारल्यानं सिंह आला, पण गड गेला, अशी त्यांची अवस्था झाली आहे.