महाराष्ट्र

maharashtra

गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्याकरिता क्वाडची मोहिम, पंतप्रधान मोदींकडून ७.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर - PM Modi us visit

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

PM Modi us visit पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान हे क्वाड समूहाच्या बैठकीला उपस्थित राहिले. पंतप्रधान आज रात्री न्यूयॉर्कमध्ये भारतीय प्रवासी समुदायाला संबोधित करणार आहेत.

PM Modi us visit
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा (Source- ANI)

वॉशिंग्टन PM Modi us visit-पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. शनिवारी फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय प्रवासी समुदायाकडून पंतप्रधानांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी आज न्यूयॉर्क शहरात भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत म्हटलं, "फिलाडेल्फियामध्ये पोहोचलो आहे. आजचा कार्यक्रम क्वाड शिखर संमेलन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीवर केंद्रित असेल. संपूर्ण दिवसभरात पृथ्वीला आणखी चांगले करण्याकरिता आणि जागतिक आव्हानांवर मात करत योगदान देण्याकरिता असेल, यावर माझा विश्वास आहे." "भारतीय समुदायानं अमेरिकेत आपली वेगळी ओळख तयार केली आहे. विविध क्षेत्रावर सकारात्मक परिमाण केला. त्यांच्याशी संवाद साधून नेहमीच आनंद वाटतो. रविवारी २२ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क शहरात मोदी इन यूएस कार्यक्रमात संबोधित करणार आहे," अशी माहिती पंतप्रधानांनी सोशल मीडियावर दिली.

कॅन्सरविरोधात मोहिमेकिरता ७.५ दशलक्ष डॉलर-भारताच्या 'एक पृथ्वी, एक आरोग्य' व्हिजनला अनुसरून पंतप्रधान मोदी यांनी 'क्वाड कॅन्सर मूनशॉट' मोहिमेसाठी ७.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली. पंतप्रधान मोदींनी सहाव्या क्वाड्स नेते परिषदमध्ये ही घोषणा केली. या मोहिमेच्या निधीतून कॅन्सरचे निदान करणाऱ्या किट्स आणि लशींचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "गर्भाशयाच्या कॅन्सरला एकत्रितपणे तोंड देण्याचं आम्ही निश्चित केलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं त्यांचा मनापासून मी आभारी आहे."

  • जागतिक व्यासपीठावरील भारताच्या नेतृत्वाचं जो बायडेन यांनी कौतुक केले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी-२० परिषदेतील नेतृत्व आणि दक्षिण आशियामध्ये क्वाडचे सामर्थ्य बळकट करण्याबरोबर प्रशांत महासागरात खुले वातावरण निर्माण केल्यानं बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केले.

क्वाडमधील बैठक फलदायी-अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्याबाबतची बैठक ही अत्यंत फलदायी असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळविण्यासाठी अमेरिका आग्रही असल्याचे बायडेन यांनी बैठकीत सांगितलं. पंतप्रधान मोदींनी क्वाड समूहाच्या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यासह इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो यांचा समावेश आहे. क्वाड समूहात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. या देशांची एकूण १.९ अब्ज लोकसंख्या आहे.

हेही वाचा-

  1. "तुकडे-तुकडे गँग आणि अर्बन नक्सल काँग्रेस चालवते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल - PM Narendra Modi Wardha Visit
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, 'राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा' कार्यक्रमात होणार सहभागी - PM Narendra Modi Wardha Tour

ABOUT THE AUTHOR

...view details