महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पंतप्रधानांनी यूएईच्या अध्यक्षांशी केली चर्चा; पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन - मोहम्मद बिन झायेद अल नाहयान

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय UAE दौऱ्यावर आहेत. मोदी यांचं अबुधाबी येथे पोहोचताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं. UAE राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मोंदींची गळभेट घेत स्वागत केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 9:02 PM IST

अबू धाबी:पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी अबुधाबीला पोहोचल्यानंतर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मोदींची गळाभेट घेत स्वागत केलंय. पंतप्रधान मोदींचं आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

गेल्या सात महिन्यांत 5 वेळा भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी यांनी मंगळवारी त्यांचे समकक्ष राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी अनेक सामंजस्य करारांची (MOU) देवाणघेवाण केली. पीएम मोदींनी गेल्या सात महिन्यांत मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची पाच वेळा भेट झाल्याचं सांगितलं. UAE च्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल सर्वप्रथम 'मी' तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या सात महिन्यांत आम्ही पाच वेळा भेटलो आहोत. जे फारच दुर्मिळ आहे. मलाही येथे सात वेळा येण्याची संधी मिळाली आहे. आम्ही प्रकारे प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. भारत-यूएई यांच्यात प्रत्येक क्षेत्रात संयुक्त भागीदारी आहे.

  • BAPS हिंदू मंदिराचं करणार उद्घाटन : तसंच मोदींनी संयुक्त अरब अमिरात देशातील पहिल्या हिंदू मंदिराच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल UAE नेत्याचे आभार मानले. ते म्हणाले, 'येथे BAPS (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) मंदिराचं बांधकाम तुमच्या सहकार्याशिवाय शक्य झालं नसतं.' उद्या या मंदिराचं पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत.
  • पंतप्रधान मोदींनी केली सोशल मीडियावर पोस्ट : "अबू धाबी विमानतळावर माझं स्वागत करण्यासाठी वेळ काढल्याबद्दल माझं भाऊ, HH @MohamedBinZayed यांचा मनःपूर्वक आभारी आहे. भारत-UAE मधील मैत्री आणखी घट्ट करणारी फलदायी भेटीची मी आतुरतेनं वाट पाहत आहे," अशी पोस्ट पंतप्रधान मोदींनी करत एक्स मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

'अहलान मोदी' कार्यक्रमाला करणार संबधित : UAE मधील मोदींचा हा UAE मधील आठवा दौरा आहे. दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यासाठी मोदींच्या दौऱ्यांकडं पाहिलं जात आहे. UAE मधील खराब हवामानामुळं हा दौरा कमी करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आज अबुधाबीमध्ये 'अहलान मोदी' समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. UAE मध्ये पश्चिम आशियातील भारताच्या सर्वात जवळच्या धोरणात्मक भागीदारांच्या प्रमुख नेत्यांना भेटण्याबरोबरच पंतप्रधान अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये होणाऱ्या "अहलान मोदी" कार्यक्रमापूर्वी भारतीय डायस्पोरा असलेल्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी बुधवारी कतारला जाणार :आदल्या दिवशी, 'अहलान मोदी' समुदायाचे नेते सजीव पुरुषोथमन यांनी सांगितलं की, अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींच्या आतापर्यंतच्या सर्वात कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे. UAE दौऱ्याची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान मोदी बुधवारी कतारला जाणार आहेत. 2014 नंतर मोदींची ही दुसरी कतार भेट असेल. कतारच्या अमीरानं रविवारी संशयित हेरगिरीसाठी तुरुंगात टाकलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या खलाशांची सुटका करण्याच्या घोषणेनंतर ही भेट होणार आहे.

दोन्ही देशातील सहकार्य वाढलं : परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) नुसार, PM मोदी आणि UAE चे अध्यक्ष त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत अनेक क्षेत्रांमध्ये आर्थिक संबंध विस्तारण्यावर चर्चा करतील. यामध्ये ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा व्यापार, बंदरे, रेल्वे आणि सागरी रसद, तसंच डिजिटल पायाभूत सुविधा, फिनटेक कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. “गेल्या नऊ वर्षांत, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, अन्न, ऊर्जा सुरक्षा, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात UAE सह आमचं सहकार्य अनेक पटींनी वाढलं आहे. आमचे सांस्कृतिक नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे,” असं पंतप्रधानांच्या या भेटीपूर्वीच्या वक्तव्यात नमूद केलं आहे.

  • भारताचे कतारशी जवळचे मैत्रीपूर्ण संबंध : भारताचे कतारशी ऐतिहासिकदृष्ट्या जवळचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असंही मोदींनी म्हटलं आहे. "अलिकडच्या वर्षांत, उच्च-स्तरीय राजकीय देवाणघेवाण, दोन देशांमधील वाढता व्यापार, गुंतवणूक, आमची ऊर्जा भागीदारी मजबूत करणं, संस्कृती आणि शिक्षणातील सहकार्य यासह सर्व क्षेत्रांमध्ये आमचे संबंध दृढ होत आहेत.

हे वाचलंत का :

  1. 'Floor Test' अर्थात बहुमत चाचणी ही संज्ञा आणि भारतीय राजकारण
  2. महाराष्ट्रातून स्थानिक नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसवर दबाव?
  3. अशोकराव चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं - रमेश चेन्नीथला

ABOUT THE AUTHOR

...view details