महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ईव्हीएम मशिन हॅक होतात का? एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली भीती

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाला पाहिजे, असं मतही त्यांनी मांडलंय.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

Only do paper ballots Elon Musk says EVM machines rig elections
एलॉन मस्क (ETV Bharat)

पेनसिल्व्हेनिया : दुसरीकडं महासत्ता असलेल्या अमेरिकेत देखील निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. असं असतानाच एक्स सोशल मीडियाचे मालक तथा अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदान यंत्रांबाबत मोठं वक्तव्य केलंय.

नेमकं काय म्हणाले एलॉन मस्क? :एकाअमेरिकन न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियामधील एका टाऊन हॉलमध्ये बोलत असताना एलॉन मस्क यांनी ईव्हीएमचा वापर करुन मतदानात हेराफेरी करता येत असल्याचा दावा केलाय. तसंच निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पुढं डोमिनियन कंपनीच्या मतदान यंत्रांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, "फिलाडेल्फिया आणि ऍरिझोना व्यतिरिक्त या मशीन्स इतरत्र कुठंही वापरल्या जात नाहीत. या दोन्ही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झालाय. हा एक विचित्र योगायोग आहे. तर संगणकीय प्रोग्राम हॅक करता येऊ शकतात. त्यामुळं ईव्हीएमवर अधिक विश्वास ठेवता येणार नाही."

कंपनीनं आरोप फेटाळला : एलॉन मस्क यांनी केलेल्या दाव्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर ईव्हीएम मशीन बनवणारी कंपनी डोमिनियननं मस्क यांचा आरोप फेटाळलाय. कंपनीच्या प्रवक्त्यानं म्हटलंय की, "डोमिनियन फिलाडेल्फिया राज्यात सेवा देत नाही. तसंच, आमची मतदान प्रणाली मतदाराला बॅलेट पेपरवर दिलेल्या मताची पुष्टी करण्यास मदत करते. आम्ही अनेक वेळा मशिनच्या मतांची आणि बॅलेट पेपर मतांची मोजणी एकत्र करून ऑडिट केलेत. त्यामुळं यावरुन हे सिद्ध होतं की आमचं मशीन व्यवस्थित काम करतंय.

  • दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वीदेखील एक्स मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशिन हॅक होतात, असं मत व्यक्त केलं होते. त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रासह झारखंडमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी मस्क यांनी ईव्हीएम मशिनबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा -

  1. "ईव्हीएम 100% फूलप्रूफ": मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले
  2. हरियाणाचा निकाल मान्य नाही, निवडणूक आयोगाकडं जाणार; 'ईव्हीएम'वर काँग्रेसचा भरोसा नाय
  3. ईव्हीएम मशीननं उठवलं रान; 'ईव्हीएम' खरंच हॅक होतं का? जाणून घ्या... - EVM Machine Hacking
Last Updated : 2 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details