महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह 9 जणाचा विमान अपघातात मृत्यू - Saulos Chilima dies in plane crash - SAULOS CHILIMA DIES IN PLANE CRASH

Saulos Chilima died in plane crash : मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमासह इतर नऊ जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मलावीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान रडारवरून गायब झाल्यानंतर ते सोमवारी बेपत्ता झालं होतं.

Vice President Saulos Chilima
उपराष्ट्रपीत सॉलोस चिलिमा (Photo : X@SKChilima)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 7:36 PM IST

नवी दिल्लीSaulos Chilima died in plane crash : मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मलावीचे अध्यक्ष लाजर चकवेरा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मलावीचे उपाध्यक्ष सॉलोस चिलिमा हे 9 जणांसह विमानात प्रवास करत होते. या विमान अपघातात या सर्वांचा मृत्यू झालाय.

विमान चिकंगवाच्या जंगलात सापडलं :अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर बेपत्ता विमान चिकंगवाच्या जंगलात सापडलं. या विमानात प्रवास करणारे सर्व जण मृतावस्थेत आढळले आहेत. मलावी अध्यक्षांच्या कार्यालयानं या घटनेबाबत माहिती देणारे निवेदन जारी केलंय. मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा सोमवारी विमानानं प्रवास करत होते. उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमासह इतर 9 जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची बातमी सोमवारी घडली होती. विमान बेपत्ता झाल्यानंतर, उत्तर मलावीच्या पर्वतीय जंगलात अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर क्रॅश झालेलं विमान सापडलं. विमानात उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा, माजी फर्स्ट लेडी शानिले डिझिम्बीरीसह इतर जण होते. हे विमान सोमवारी सकाळी 9.17 वाजता दक्षिण आफ्रिकेची राजधानी लिलोंगवे येथून निघालं होतं. त्यानंतर 45 मिनिटांनी विमान राजधानीपासून 370 किमी अंतरावर असलेल्या माजुझू आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं. पण, त्याआधीच या विमानाचा अपघात झाला.

विमानाशी संपर्क तुटला :माजुकू येथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानं विमानाच्या पायलटला लँडिंगचा प्रयत्न न करण्याचा सुचना दिल्या होत्या. तसंच खराब हवामानाळं विमान परत नेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला आणि लवकरच ते रडारवरून गायब झालं. विमान अपघातानंतर मलावीच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं विमानाचा शोध आणि बचाव कार्य करण्याचं आदेश दिले होते.

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचाही विमान अपघातात मृत्यू : 20 मे 2024 रोजी इराणमध्ये असाच विमान अपघात झाला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे विमान कोसळलं होतं. यामध्ये अपघातात सर्वांचा मृत्यू झाला होता. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचं विमानही अझरबैजानहून परतत असताना बेपत्ता झालं होत. त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि इतर अधिकारी होते. या अपघातात इराणच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्वांचा मृत्यू झाला होता.

हे वचालंत का :

  1. इस्रायल हमास युद्ध : आंतरराष्ट्रीय न्यायालयानं गाझात होणारा नरसंहार थांबवण्याचे दिले आदेश - Israel Hamas War
  2. इस्रायल-हमास संघर्ष कायमचा संपुष्टात येणार? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं युद्धबंदीचा ठराव केला मंजूर - Gaza ceasefire
  3. सुरक्षेच्या उल्लंघनावरुन एलन मस्क यांचा संताप : ओपनए आय डीलवरुन सर्व अ‍ॅपल उपकरणांवर बंदी घालण्याची धमकी - Elon Musk Threatens To Apple

ABOUT THE AUTHOR

...view details