महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मध्य पूर्वेत युद्धाचं ढग, हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागली डझनभर क्षेपणास्त्रे - israel iran news

Hezbollah Missile Firing : इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाहनं लेबनॉनमधून,उत्तर इस्रायलच्या दिशेनं डझनभर क्षेपणास्त्रं डागली. मात्र, ही क्षेपणास्त्रं देशाच्या संरक्षण यंत्रणेच्या आयर्न डोमनं रोखली. इस्रायलच्या संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार हिजबुल्लाहनं सुमारे 40 क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

Hezbollah Missile Firing
हिजबुल्लाहनं उत्तर इस्रायलवर डागली डझनभर क्षेपणास्त्रे; अमेरिकेनं दिला होता इशारा

By ANI

Published : Apr 14, 2024, 7:39 AM IST

तेल अवीव (इस्रायल) Hezbollah Missile Firing : दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली लष्करी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्लाहनं इस्त्रायली तोफखान्यावर "डझनभर रॉकेट" डागले आहेत. हा गाझावरील युद्ध सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा हल्ला आहे. उत्तर इस्रायल आणि व्यापलेल्या गोलान हाइट्समधील शत्रूच्या तोफखाना तळांवर डझनभर रॉकेट सोडल्याची हिजबुल्लाहनं एका निवेदनात पुष्टी केली.

40 रॉकेट डागले : इस्रायलवरील या हल्ल्यांमुळं सायरन वाजले. त्यानंतर हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना लक्ष्य केलं. इस्रायली सैन्यानं सांगितलं की, "लेबनीज प्रदेशातून 40 प्रक्षेपण ओळखले गेले. त्यापैकी काही रोखण्यात आले. तर बाकीचे मोकळ्या जागेत पडले. यात कोणलाही दुखापत झाली नाही." तसंच त्यांनी यापूर्वी शुक्रवारी उशिरा लेबनॉनमधून इस्रायली हद्दीत घुसलेल्या हिजबुल्लाहद्वारे संचालित दोन स्फोटकांनी भरलेले ड्रोन रोखले होते, असंही इस्रायली सैन्यानं म्हटलं.

हिजबुल्लाहचा हल्ला : इस्रायलनं शनिवारी हिजबुल्लाचा प्रमुख स्थळ असलेल्या आग्नेय लेबनॉनमध्ये किमान पाच हवाई हल्ले केले होते. हवाई दलानं शनिवारी सांगितलं की इस्रायली युद्ध विमानांनी हिजबुल्लाहद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोठ्या सैन्यदलाच्या संकुलला लक्ष्य केलं होतं. इस्त्रायलनं सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावरील हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात लेबनॉन आणि सीरिया ऑपरेशन्सच्या प्रभारी दोन जनरल्ससह सशस्त्र दलाचे सात सदस्यांचा मृत्यू झाला होता. याचा बदला म्हणून इस्रायलवर इराणकडून हल्ला होण्याची शक्यता वाटत होती. अशातच हिजबुल्लाहनं इस्त्रायलवर हल्ला केला.

  • अमेरिकेनं इस्रायलला दिला इशारा : दुसरीकडं इराण उशिरा का होईना हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेनं यापूर्वीच इस्रायलला दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपण इस्रायलला पाठिंबा देणार असल्याचंही जाहीर केलं. इराण- इस्त्रायलमधील संबंध बिघडल्यानं युद्धाची शक्यता आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं भारतीयांना इराण आणि इस्रायलमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिलाय. याव्यतिरिक्त, एप्रिल-मेमध्ये 6,000 कामगार इस्रायलला पाठवण्याचा निर्णयदेखील पुढील आदेशापर्यंत पुढं ढकलण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. मध्यपूर्वेत धोक्याची घंटा, इराणनं जप्त केलं इस्रायलचं जहाज; भारताकडून ॲडव्हायझरी जारी - Iran seizes Israeli ship
  2. पाकिस्तान अमेरिका संबंध सुधारणार; राष्ट्राध्यक्ष जो बायडननं लिहिलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र - US Pak Ties

ABOUT THE AUTHOR

...view details