जेरुसलेम/वॉशिंग्टनIran Attacks Israel - इराणनं बॅलिस्टिक हल्ल्यात इस्रायलवर हल्ला करून सैन्यदलाच्या आस्थापनांना लक्ष्य केलं. इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या माहिती (IDF) नुसार, इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं इराणनं डागलेल्या 180 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी अनेक क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आले. मात्र, या युद्धानंतर पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली.
इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणनं हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाह याच्या हौतात्म्याचा हा पहिला बदला असल्याचं म्हटलं. त्याचवेळी, इराणच्या हल्ल्यानंतर लगेचच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या मदतीसाठी इराणची क्षेपणास्त्रे पाडण्याचे सैन्यदलाला आदेश दिले आहेत. ही माहिती व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं (NSSC) माध्यमांना दिली आहे. एनएसएससीचे प्रवक्ता सीन सेवेटनं एक्स मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, "जो बायडेन आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस हे व्हाईट हाऊसमधील परिस्थिती कक्षातून (situation room) हल्ल्यावर देखरेख करत आहेत. तसेच सातत्यानं अपडेट घेत आहेत."
मोठा हल्ला करण्याची धमकी -इराणच्या एका माध्यमाच्या वृत्तानुसार, इराणनं इस्रायलवर केलला हल्ला म्हणजे हसामसचे सर्वोच्च नेते इस्माईल हनीयेह आणि आयआरजीसी कमांडर मेजर जनरल सय्यद अब्बास निलफोरौशन यांच्या हत्येचा बदला असल्याचं आयआरजीसीनं म्हटलं आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ही इराणच्या सैन्यदलाची शाखा आहे. इस्त्रायलकडून प्रत्युत्तर देण्यात आल्यास आणखी दुसरा मोठा हल्ला करण्याची आयआरजीसीनं धमकी दिली आहे.
अमेरिकेकडून इराणला इशारा-लेबेनॉननमधील हिजबुल्लाहचा कमांडरठार झाल्यानंतर इराणकडून इस्रायलवर हल्ला होणार असल्याचा अमेरिकेकडून यापूर्वीच इस्त्रायलला सावधानतेचा इशारा दिला होता. इस्रायलवर हल्ला केला तर त्याचे इराणला कठोर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीदेखील अमेरिकेकडून देण्यात आली होती. त्याकडं सपशेल दुर्लक्ष करत इराणनं मंगळवारी रात्री 10 वाजता इस्रायलवर 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. संपूर्ण इस्रायलवर सुमारे 30 मिनिटे हल्ला सुरू होता. यावेळी इस्रायल्या सैन्यदलानं आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लपून राहण्याचे आदेश दिले.
हेही वाचा-
- इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला ; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले ही इराणची मोठी चूक, करारा जवाब मिळणार - Iran Israel War live Update
- हिजबुल्लाहच्या प्रमुखाला ठार केल्यानंतर इस्रायलचा इराणला इशारा; "आम्हाला लक्ष्य करतात त्यांना..." - israel hezbollah war