जॉर्जिया/चंदीगड -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर ( Jimmy Carter News) यांचे वयाच्या 100 व्या वर्षी रविवारी (अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार) निधन झाले. जिमी कार्टर हे अमेरिकेचे सर्वाधिक काळ राष्ट्राध्यक्ष राहिले. हरियाणातील एका गावाला त्यांच नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत जाणून घेऊ.
- जिम कार्टर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना फेब्रुवारी 2023 मध्ये अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी रुग्णालयातून आयुष्याचा वेळ घरी कुटंबासमवेत डॉक्टरांच्या देखरेखीखाली घालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निधनानं जगभराती नेते शोक व्यक्त करत आहेत.
जिम कार्टर यांचा असा राहीला जीवनप्रवास
- लहान शहरातील भुईमुगाचे शेतकरी ते अमेरिकेतील नौदलाचे अधिकारी असे उत्तुंग यश त्यांनी मिळविलं होते.
- राजकीय जीवनात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 1971 ते 1975 पर्यंत जॉर्जियाचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले.
- अमेरिकेचे 39 वे अध्यक्ष म्हणून त्यांच्या पुढाकारानं केलेल्या कॅम्प डेव्हिड कराराची आठवण नेहमी केली जाते. या करारामुळे इस्रायल आणि इजिप्तमध्ये शांतता करार झाला. हा करार आजतागायत अबाधित आहे.
- त्यांनी आंतरराष्ट्रीय संघर्षांवर शांततापूर्ण उपाय शोधण्यासाठी, लोकशाही आणि मानवी हक्कांची प्रगती करण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.
- जिम कार्टर यांनी मानवी हक्कांना अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात महत्त्वाचं स्थान दिल होतं.
जिम कार्टर यांचे हरियाणाशी हे होते कनेक्शन-1978 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर भारत भेटीवर आल्यावर त्यांनी हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या गावाला भेट दिली होती. हे गाव आता कार्टरपुरी म्हणून ओळखले जाते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या अनेक मंत्र्यांसह जिमी कार्टर आणि त्यांच्या पत्नीला नसीराबादमध्ये घेऊन गेले.
जिमी यांनी नसीराबादची निवड का केली?-जिमी कार्टर यांनी भेट देण्यासाठी हरियाणातील दौलतपूर नसीराबाद गाव का निवडले? याबाबत बोलताना स्थानिक ग्रामस्थ अतार सिंह यांनी सांगितले, " मला चांगलं आठवतं की, जिमी कार्टर येणार असल्यानं आमच्या गावात स्वच्छता सुरू झाली. सुरक्षा दलांच्या हालचाली वाढल्या होत्या. जिमी कार्टर यांची आई लिलियन कार्टर स्वातंत्र्यापूर्वी या गावात येत असत. परिचारिका असण्यासोबतच त्या समाजसेविकाही होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिलियन कार्टर याच गावात जेलरच्या घरी राहायचे. त्यामुळेच जिमी कार्टर भारत दौऱ्यावर असताना त्यांच्या आईनं त्यांना या गावाला भेट देण्यास सांगितलं होते.
नोबेल मिळाल्यानंतरदेखील गावात जल्लोष-जिमी कार्टर यांनी या गावाला भेट दिल्यानंतर भारत सरकारनं या गावाचे नाव बदलून कार्टरपुरी केले. जिमी कार्टरने गावाला टीव्ही आणि दुर्बीण भेट दिली होती. जिमी कार्टरच्या पत्नीनं रोझलिन यांनी हरियाणवी कपडे परिधान केले होते. जिमी कार्टर यांनी गाव दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नकार देत गावाचा विकास करून घेऊ, असे आश्वासन दिलं होतं. कार्टर यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यावर गावात जल्लोष झाला होता.