महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मालदीवच्या संसदेत तुफान राडा, खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणलं! पाहा व्हिडिओ - Maldivian Democratic Party

Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत खासदारांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात हा प्रकार घडला.

Clash in Maldives Parliament
Clash in Maldives Parliament

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:17 PM IST

माले (मालदीव) Clash in Maldives Parliament : मालदीवच्या संसदेत रविवारी जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी मंत्रिमंडळाला मंजुरी देण्यासाठी विशेष सत्र बोलावलं होतं. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली.

खासदारांनी एकमेकांना लाथा-बुक्क्या हाणल्या : रविवारी मालदीवच्या संसदेत, पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी), प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्स (पीपीएम) आणि विरोधी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) खासदार एकमेकांशी भिडले. एका स्थानिक वृत्तवाहिनीनं याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये खासदार एकमेकांना लाथा-बुक्क्या मारत असल्याचं दिसतंय. यावेळी एका खासदाराला जमिनीवर फेकण्यात आलं, तर एकानं दुसऱ्या खासदाराच्या मानेवर पाय ठेवल्याचंही दिसतंय. तेथे उपस्थित असलेले इतर खासदार यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

संसद परिसरात गोंधळ : व्हिडीओमध्ये खासदार एकमेकांना जमिनीवर फेकताना दिसत आहेत. ते एकमेकांचे केस ओढत आहेत आणि एकमेकांना लाथा मारत आहेत. ज्या खासदाराचे केस ओढले, ते स्पीकरजवळ काहीतरी वाद्य वाजवताना दिसतात. ते स्पीकरला काम करण्यापासून रोखत होते, तर स्पीकर आपले कान बंद करून असल्याचं दिसतंय. या गदारोळानंतर संसद परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

वाद का निर्माण झाला : स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, विरोधी खासदारांना सत्ताधारी पक्षासाठी असलेल्या चेंबरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. सर्वाधिक जागा असलेल्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पक्षानं मुइझू मंत्रिमंडळातील चार खासदारांना प्रवेश देण्यास नकार दिला. यानंतर हा वाद सुरू झाला. या वादासाठी पीएनसी आणि पीपीएमनं एमडीपीला जबाबदार धरलंय. यामुळे संसदेचं कामकाज विस्कळीत झालं होतं.

हे वाचलंत का :

  1. मालदीवच्या राष्ट्रपतींचा सूर बदलला, भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले...
  2. मालदीवच्या राष्ट्रपतींचा पुन्हा भारतद्वेष, 'त्या' एका निर्णयानं निष्पाप 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details