हैदराबाद - WORLD HUNGER DAY 24: मनुष्याच्या जीवनात अन्न महत्वाची भूमिका बजावते. मुलभूत गरजाच्या घटकामध्ये अन्न प्रथमस्थांनी आहे. परंतू, मनुष्य प्रत्येक दिवशी अन्नाची नासाडी करतो. दुसरीकडे जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात. भारतात अन्नाची नासाडी आणि कुपोषण या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत. एकीकडे श्रीमंत व्यक्ती अन्नावर भरपूर खर्च करतो. परंतू काहींच्या नशीबी एका वेळेचं जेवण मिळत सुद्धा नाही. परिणामी कुपोषणाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं उपासमारीचे संकट आणि कुपोषणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 28 मे रोजी जागतिक भूक दिवस साजरा करण्यात येतो.
यावर्षीची थीम:'संपन्न माता, भरभराटीचे जग' ही जागतिक भूक दिन 2024 ची थीम आहे.
जागतिक भूक दिनाचा इतिहास: 2011 मध्ये हा दिवस सुरु करण्यात आला. उपासमारीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत उपक्रमांद्वारे समस्या सोडवण्याच्या उद्देशानं 'द हंगर प्रोजेक्ट'नं हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 28 मे रोजी जागितक भूक दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक स्तरावरीव तथ्य
- जगात 8 अब्ज लोकांच पोट भरेल एवढ अन्न आहे. तरीही जगातील 828 दशलक्ष लोक दररोज उपाशी असतात.
- जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण राज्य (SOFI) 2023 रिपोर्ट जगतिक स्तरावर 42 टक्के लोक निरोग आहार घेऊ शकत नाहीत.
- युनिसेफच्या 23 च्या आकडेवारी जागतिक स्तरावर 1 अब्ज मुली आणि महिलांना कुपोषणाचा सामना करावा लागतो.
- डब्लूएचओ 2023 रिपोर्टनुसार 5 वर्षांखालील 149 दशलक्ष मुलांची वाढ झाली नाही.
- जागतिक लोकसंख्येच्या 29.6 टक्के लोकांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नाही.
- दरवर्षी नऊ दशलक्ष लोक उपासमारी संबंधित कारणांमुळं मरतात. यात 5 वर्षाखालील मुलांची संख्या जास्त आहे.
- 2022 मध्ये, युक्रेनमधील संघर्षामुळे तीव्र उपासमारीला सामोरं जाणाऱ्या लोकांची संख्या तीन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढली.
- 2030 शून्य उपासमारीचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रांच आहे. या दशकाच्या शेवटी 670 दशलक्ष लोक अजूनही उपासमारीला सामोरं जातील असा त्यांचा अंदाज आहे.