महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक चॉकलेट दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि याचं महत्व - WORLD CHOCOLATE DAY 2024 - WORLD CHOCOLATE DAY 2024

World Chocolate Day 2024 : आज जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी तुम्ही आज घरी चॉकलेट तयार करू शकता.

World Chocolate Day 2024
जागतिक चॉकलेट दिन 2024 (विश्व चॉकलेट दिवस (Getty Images))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 3:25 PM IST

मुंबई - World Chocolate Day 2024 :जागतिक चॉकलेट दिन दरवर्षी 7 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस चॉकलेट प्रेमींसाठी खूप खास आहे. चॉकलेट हे किती आरोग्यासाठी फायदेशीर याबद्दल तुम्ही आज जाणून घेऊ शकता. चॉकलेट सगळ्यांनाच आवडते. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट विकण्यासाठी देखील असतात. 7 जुलै 1550 मध्ये चॉकलेट पहिल्यांदा युरोपमध्ये तयार करण्यात आले होते. पहिला जागतिक चॉकलेट दिन 2009 मध्ये साजरा करण्यात आला. चॉकलेट हे आंबवलेले खाद्यपदार्थ आहे. फ्रूट प्लांट कोको जेव्हा झाडावरून तोडल्या जाते, यानंतर फळामधील पांढरा पदार्थ साफ करून याला वाळवतात आणि आंबवले जाते. तसेत यावरचे कवच काढल्यानंतर यामधून कोको निब्स निघतात.

जागतिक चॉकलेट दिन 2024 (विश्व चॉकलेट दिवस (Getty Images))
जागतिक चॉकलेट दिन 2024 (विश्व चॉकलेट दिवस (Getty Images))

चॉकलेट कसे बनवतात: चॉकलेट बनविणारे लोक निब्स कोकोला मासमध्ये बारीक करतात. यानंतर त्यांना कोको सॉलिड्स आणि कोकोआ बटरमध्ये वेगळे करतात. यात दूध आणि साखर मिसळतात. जर ते पांढरे चॉकलेट बनवत असतील तर त्यात फक्त दूध आणि साखर बटर टाकतात. प्रत्येक चॉकलेट बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. चॉकलेट हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आज चॉकलेट बनवायचं असेल, तुम्ही काही चॉकलेट बार घरी विकत घेऊन बनवू शकता. याशिवाय मिठाईच्या दुकानात जावून तुम्ही आज सर्व प्रकारांचा चॉकलेटचा आस्वाद घेऊ शकता.

जागतिक चॉकलेट दिन 2024 (विश्व चॉकलेट दिवस (Getty Images))

चॉकलेटचं अतिसेवन घातक :चॉकलेटच्या अतिसेवनामुळे वजन वाढ होते. चॉकलेटचे दररोज सेवन केल्यानं दातांना नुकसान होते. चॉकलेटच्या अनावश्यक सेवनामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. यात व्हॅसोएक्टिव्ह अमाईन असतात, ज्यामुळे मायग्रेनची समस्या निर्माण होते. दरम्यान कोको बीनचा उगम अमेझॉनमध्ये झाला. जगातील सुमारे 30 टक्के कोको आफ्रिकेत घेतले जाते. वर्ल्ड चॉकलेट डे व्यतिरिक्त, चॉकलेटला समर्पित इतर अनेक दिवस आहेत जसे की बिटरस्वीट चॉकलेट डे (10 जानेवारी), मिल्क चॉकलेट डे (28 जुलै), व्हाईट चॉकलेट डे (22 सप्टेंबर), चॉकलेट कव्हर्ड एनीथिंग डे (16 डिसेंबर) असे अनेक दिवस साजरे केले जातात. भारतात, कोकोची लागवड प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये केली जाते, जे एकूण उत्पादनाच्या सुमारे 80 टक्के आहे.

सर्वोत्तम चॉकलेटचे उत्पादन करणारे देश

इटली

बेल्जियम

इक्वेडोर

स्वित्झर्लंड

आयव्हरी कोस्ट

संयुक्त राष्ट्र

युनायटेड किंगडम

चॉकलेटचे फायदे

मानसिक समस्यांविरूद्ध मदत करू शकते.

चॉकलेट तणाव कमी करू शकते.

डार्क चॉकलेटमुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो.

चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

हेही वाचा :

  1. डॉक्टर दिनानिमित्त इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या... - national doctors day 2024
  2. रिमझिम पाऊस सुरू असताना बनवा वेगवेगळ्या प्रकारचे समोसे - samosa varieties
  3. 'जागतिक रक्तदाता दिवस'!जाणून घ्या रक्तदानाचे फायदे - WORLD BLOOD DONATION DAY

ABOUT THE AUTHOR

...view details