हैदराबाद Best Utensils for Cooking :आपलं स्वयंपाक घर परिपूर्ण असावं अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. त्यासाठी विविध प्रकारची भांडी जमवन्याकडे त्यांचा कल असतो. डोळ्यांना मोहून टाकणारी आणि विविध खाद्यपदार्थांसाठी विशेष भांडी स्वयंपाक घराची जागा व्यापत आहेत. काहींचे रंग तर काहींचे डिझाइन अनेकांना आकर्षित करतात. काही लोकं ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतात तर काहींना स्टेनलेस स्टीलमध्ये अन्न शिजवायला आवडते.
ग्रामीण आणि कमी विकसित भागाबाबत बोलायचं झालं, तर आजही तेथील लोकांना लोखंडी आणि मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं आवडतं. आपल्या आवडीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणं आणि खाणं हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे, परंतु आपण स्वयंपाक करण्यासाठी कोणत्या धातूची भांडी वापरावी, त्यामुळं आपल्या आरोग्याला काय फायदा होईल? त्याचे नुकसान काय? भांडी घेताना हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात? स्वयंपाकघर आता हायटेक स्पेस बनली आहेत. अनेक जण स्टील किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यांऐवजी नॉन-स्टिक भांडी वापरण्यास प्राधान्य देतात. ही भांडी अन्न जास्त गरम होण्यापासून किंवा चिकटण्यापासून प्रतिबंधित असले तरी ते आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी आहेत. अलीकडे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि राष्ट्रीय पोषण संस्था (NIN) यांनी भारतीयांसाठी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या संस्थेच्या अहवालात मातीच्या भांड्यांच्या सुरक्षिततेवर आणि फायद्यांवर भर दिला आहे.
मातीच्या भांड्यांचे काय फायदे आहेत? मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणं फार सुरक्षित आहे. अन्न तयार करण्यासाठी मातीची भांडी वापरताना तेल कमी लागतं. हे पर्यावरणास अनुकूल आहेत आणि अन्नाचे पौष्टिक मूल्य जसेच्या तसे राखतात. मातीची भांडी अन्न शिजवताना चांगली उष्णता देतात. यामुळे पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत देखील होते.
धातूची भांडी:आपण अनेक प्रकारची भांडी वापरतो. ती विविध धातूंनी बनलेली असतात. परंतु ते आरोग्यासाठी धोकादायक आहेत. ॲल्युमिनियम, लोखंड, पितळ किंवा तांबे अन्न शिजवताना किंवा साठवताना त्यात धातू प्रवेश करू शकतात. त्यामुळे लोणचं, चटण्या, सांबार यासारखी आम्लयुक्त पदार्थ ॲल्युमिनियम, लोखंड, पितळ किंवा तांब्याच्या डब्यात ठेवणं चांगलं नाही.